Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

यवतमाळमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर निशाणा साधत शिवसैनिकांना "गद्दार जिथे सापडतील तिथे जाब विचारा" असा थेट आदेश दिला. यावेळी त्यांनी भाजपवरही फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 02:57 PM
'गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..'; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

'गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..'; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना, “गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे त्यांना जाब विचारा,” असा थेट आदेश दिला.

“वाघाचं जीवन जगत होता, आता गाढवाचं जीवन जगा”

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली. “दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली होती. तेव्हा त्यांनी मुलीची सोयरिक जुळवायची असल्याचे सांगितले होते. मला वाटले मुलीची सोयरिक जुळवत आहेत, पण दोन दिवसांनी कळलं की स्वतःचीच सोयरिक जुळवली. आता गेले सासरी, तिकडेच नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होता, आता तिकडे गाढवाचं जीवन जगा,” असा टोला त्यांनी लगावला.

“प्रत्येक गद्दाराला जाब विचारा“

यावेळी त्यांनी शिवसैनिकांना पुढील तीन वर्षे बंडखोर खासदारांना सातत्याने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. “हा गद्दार जिथे सापडेल तिथे त्याला जाब विचारा, मी तुला निवडून आणलं, मग गद्दारी का केली? मला पैशांची लालसा असती तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे प्रत्येक गद्दाराला जाब विचारण्याचा कार्यक्रम पुढील तीन वर्षे सुरू ठेवा,” असे ठाकरे म्हणाले.

ठाकरेंचा भाजपवरही घणाघात

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “निवडणुका नसतानाही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची घोषणा ‘अब की बार ४०० पार’ होती, पण मी म्हणालो होतो ‘अब की बार तडीपार’. त्यांना संविधानात बदल करून हुकूमशाहीची व्यवस्था आणायची आहे. गुलामगिरी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत,” असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

“पुढचा खासदार भगव्याशी निष्ठा ठेवणारा..”

ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. “हे काम सोपं नाही. गद्दारी का झाली, हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. पुढचा खासदार भगव्याशी कट्टर निष्ठा ठेवणारा असला पाहिजे. त्यामुळे आजपासूनच प्रत्येक शिवसैनिकाने कामाला लागावं,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

‘राम मंदिरासाठी चांदीची वीट दिली याचा पुरावा काय?’; नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल

Web Title: Uddhav thackeray orders shiv sainiks question rebel mps yavatmal rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.