Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray: 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान दाखवण्यात आलेल्या कथित व्हिडिओ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 12:00 PM
Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स
  • 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स
  • 2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघांतील प्रकरण
  • उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेत डावखरेंच्या दाखवलेल्या व्हिडीओबाबत समन्स
Uddhav Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सर्वेसर्वो उद्धव ठाकरे यांना 22 एप्रिल 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात घडलेल्या कथित बदनामी प्रकरणी कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात थेट लढत झाली होती. प्रचारादरम्यान तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली येथे घेतलेल्या सभेत वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोप

वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेटाळून लावत तो मॉर्फ (संपादित) करण्यात आल्याचा आरोप केला होता. व्हिडिओतील मजकूर निवडक पद्धतीने एडिट करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेकडून हा व्हिडिओ अस्सल असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्याची भूमिकाही पक्षाने घेतली होती. त्यानंतर वसंत डावखरे यांनी न्यायालयात धाव घेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला.

कोर्टाचे समन्स

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान आता कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावत 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सुनावणीत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार आणि त्यांच्या बाजूने कोणते युक्तिवाद केले जाणार, याकडे राजकीय आणि कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुढे काय होणार?

या प्रकरणातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या खटल्याची पुढील कायदेशीर दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या भूमिकेवर आणि न्यायालयातील पुढील सुनावणीवर या प्रकरणाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार असल्याचे कायदेविषयक जाणकारांचे मत आहे. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर या बहुचर्चित प्रकरणातील पुढील घडामोडी आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

‘दिपकेंची जात आडवी आली का?’ तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Web Title: Uddhav thackeray summoned by kalyan court in vasant davkhare case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
1

पुणे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

‘दिपकेंची जात आडवी आली का?’ तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात
3

‘दिपकेंची जात आडवी आली का?’ तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.