Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; नितीन गडकरींना मोदी डावलणार कि मिळणार पदोन्नती?

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होण्याच्या चर्चांनी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अमित शाह यांना उपपंतप्रधानपद मिळू शकते, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 04:55 PM
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; नितीन गडकरींना मोदी डावलणार कि मिळणार पदोन्नती?

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; नितीन गडकरींना मोदी डावलणार कि मिळणार पदोन्नती?

Follow Us
Follow Us:

देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. केंद्रातील महत्वाचा चेहरा मानले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या मंत्रिमंडळ फेरबदलात काय साध्य होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची थेट उपपंतप्रधानपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या वाट्याला मंत्रिमंडळ विस्तारात पदोन्नती मिळणार कि नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकार मंत्रिमंडळात फेरबदल करू शकते, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संदर्भात केंद्र सरकार किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अनेक केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची नवी संघटनात्मक टीम अंतिम टप्प्यात असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच महत्त्वाची बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या फेरवाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.

पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

या चर्चांनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो. तसेच पक्षातील काही युवा चेहऱ्यांना केंद्र सरकारमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीन गडकरींच्या पदोन्नतीची चर्चा

राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पदोन्नतीबाबतही चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना अधिक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे काही माध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटले जात आहे. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नव्या संघटनात्मक टीमची घोषणा आणि मंत्रिमंडळ विस्तार एकाचवेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, तर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

अमित शाह उपपंतप्रधान होणार?

सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उपपंतप्रधानपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा. सध्या अमित शाह हे केंद्र सरकार आणि भाजपच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, अमित शाह यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हा दावा सध्या केवळ राजकीय चर्चांवर आणि सूत्रांच्या माहितींवर आधारित आहे.

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका

अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष

आगामी विधानसभा निवडणुका, पक्ष संघटनेतील बदल आणि केंद्र सरकारची पुढील रणनीती लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र कोणत्या मंत्र्यांची खाती बदलणार, कोणाला नवी जबाबदारी मिळणार आणि उपपंतप्रधानपदाबाबत निर्णय होणार का, याचे उत्तर अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Union cabinet reshuffle nitin gadkari amit shah deputy prime minister speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Central government
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड
1

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
2

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
3

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
4

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.