डीसीएम सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौरा करुन पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतली (फोटो - एक्स)
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या दिल्ली निवासस्थानी ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ चर्चा झाली. यामध्ये सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यसभा खासदारकी तसेच राष्ट्रवादी विलीनीकरण यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यानंतर सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील.
हे देखील वाचा : महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनीटे चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला. राज्याच्या राजकारणात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठामपणे उभे राहू, असे आश्वासन देखील पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांची सदिच्छा भेट घेतली.@AmitShah pic.twitter.com/ZkJzQzARdY — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 11, 2026
पार्थ पवारांना राज्यसभा मिळण्याची शक्यता
अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार राज्यातील राजकारणामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे राज्यसभा खासदारकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. या दृष्टीने देखील सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पार्थ पवारांच्या राजकीय भविष्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिले स्थान पटकावले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यापूर्वी, भाजपने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विक्रमी जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले होते. 731 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवार गट 167 जागांसह दुसऱ्या जागेवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी अजित पवार गट देखील तितकाच महत्त्वाचा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले.






