Vadgaon Maval 103 Gram Panchayat Sarpanch reservation announced
वडगाव मावळ – सतिश गाडे : आगामी पंचवार्षिक मावळमधील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत बुधवार (दि. 23) दुपारी 12.30 वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये मावळातील 53 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे.
मावळ तालुक्यातील उधेवाडी, इंगळून, कशाळ, कुसवली, खांडी, तुंग, कान्हे, ओवळे, शिळीम, शिवणे, करूंज, जांभूळ, जांबवडे, सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण, सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी, निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे, केवरे, काले, टाकवे खुर्द, नानोली तर्फे चाकण, ओझर्डे या 53ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
याप्रसंगी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी वडगाव मावळ रमेश कदम, मंडल अधिकारी खडकाळा सुरेश जगताप, वडगावचे तलाठी विजय साळुंके, महसूल सहाय्यक बबिता सोनवणे तसेच दत्तात्रय पडवळ, चंद्रजीत वाघमारे, सुभाष धामणकर, सहादु आरडे, ज्ञानेश्वर सुतार, गणेश भांगरे, सुरेश कडू, दिलीप आंबेकर, चंद्रकांत दाभाडे, भरत नाना घोजगेसह विविध गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच मोठ्या संख्येने पस्थित होते .
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी 05 मार्च 2025 ते 04 मार्च 2030 या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील 10 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असून, त्यांचा या सोडतीमध्ये समावेश नाही. उर्वरित 93 ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, सहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, २५ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर ५३ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी अभिमन्यू गणेश ढोरे इयत्ता चौथीच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण 53 ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आल्या.
सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी,निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे हे असणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्वसाधारण – आजीवली, ठाकूरसाई, कान्हे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, आढे, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, उकसान, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहळ, कोंडीवडे (आ मा), माळवाडी, वाकसई, मुंढावरे आंबेगाव ग्रामपंचायतीबाबत आता आरक्षण स्पष्ट झाल्याने काहींची निराशा झाली असून काहींनी आनंद व्यक्त केला आहे तर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.