जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शिवसेना नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. काश्मीरच्या पर्यटनावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुण्यातील दोन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्ल्यानंतर जे पर्यटक तिथे अडकले आहेत, त्यांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील 150 पर्यटक अडकले आहेत. श्रीनगर ते दिल्ली विशेष विमानाने त्यांना आणण्यात येईल, आज शक्य झालं नाही तर, उद्या त्यांना सर्वांना आणू, असं आश्वासन खासदार मोहोळ यांनी दिलं. श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्कात असून मी माहिती घेत आहे. गृह विभागाच्या अधिकारी मदत करण्याचं काम करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही माहिती घेतली आहे. नातेवाइकांनी काळजी करू नये. आम्ही सगळे सोबत आहोत, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील काही पर्यटक काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती समजताच, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ ज्योती झुरंगी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. शासनाकडून लवकरच विमान व्यवस्थेची योजना आखली जात असून संबंधितांना याबाबत लवकरच माहिती कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांची जे स्थानिक रहिवासी काळजी घेत आहेत, त्यांचेही त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. “स्वतःचीही काळजी घ्या आणि महाराष्ट्रात परतल्यावर संपर्क साधा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना आज विधान भवन येथील उपसभापती कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतात एकात्मतेची गरज अधोरेखित करत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा दहशतवादी कारवायांमागील विघातक शक्तींना भारतीयांच्या एकजुटीचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल. हल्ल्यानंतर तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावलेल्या भारतीय लष्कराचे जवान, स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्यसेवकांचे त्यांनी विशेष आभार मानले. “या संकटाच्या वेळी जीव धोक्यात घालून मदत करणारे हे खरे देशनिष्ठ वीर आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. तसेच एकसंघ भारत हीच अशा घटना रोखण्याची खरी ताकद आणि खरी श्रद्धांजली आहे,” असेही नीमल गोऱ्हे म्हणाल्या आहेत.