Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी, विक्रम काकडेंनी घेतली अमित शाहांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन दिवंगत अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केली आहे. या मागणीला पक्षातील सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 06:34 PM
vikram kakde meets amit shah

vikram kakde meets amit shah

Follow Us
Follow Us:
  • विक्रम काकडेंची अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत भेट.
  • अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी.
  • राष्ट्रवादी आमदारांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले
 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार विक्रम काकडे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत महत्त्वाची मागणी केली. या भेटीत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने (मरणोत्तर) गौरविण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामूहिक पत्र देत अजित पवार यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा पुढचा टप्पा म्हणून विक्रम काकडे यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतल्याचे मानले जात आहे.

या मागणीत अजित पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचा आणि राज्याच्या विकासातील योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्रानुसार, त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला नवी दिशा दिली. कणखर प्रशासक, कार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रसेवेचा सर्वोच्च सन्मान म्हणून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात यावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा निर्णय! सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द; आता फक्त ‘हे’ दोनच अधिकृत चेहरे

पत्रात अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अनेक वेळा अर्थसंकल्प सादर करत विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा उल्लेख आहे. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो प्रकल्प, सिंचन व्यवस्था तसेच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी त्यांनी केलेल्या कामांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना संकटकाळात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीही त्यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी महाराष्ट्र शासनालाही यासंदर्भात अधिकृत शिफारस केंद्र सरकारकडे तातडीने पाठवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या मते, अजित पवार यांचे अचानक निधन हे राज्याच्या राजकारणासाठी मोठी हानी ठरली असून, त्यांच्या कार्याचा गौरव देशपातळीवर होणे आवश्यक आहे.

Shiv Sena Symbol: ठाकरे गटासाठी उद्याचा दिवस निर्णायक? शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल मांडणार बाजू 

दरम्यान, या मागणीवर केंद्र सरकार किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पद्म पुरस्कारांसंदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या नियमानुसार संबंधित प्रक्रियेनंतर घेतला जातो. त्यामुळे या मागणीवर पुढे काय निर्णय होतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vikram kakade meets amit shah seeks posthumous padma vibhushan for ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • NCP Party

संबंधित बातम्या

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?
1

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल
2

Sanjay Raut : अमित शाहांना गृहमंत्रिपदावरून हटवा! संजय राऊतांची मोदींकडे मोठी मागणी; 13 कोटी घुसखोरांच्या मुद्द्यावरून थेट सवाल

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण
3

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!
4

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.