Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेच्या मागणीसाठी केजमध्ये मोर्चा

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे. केजमध्ये कुटुंबीय आणि नागरिकांनी मोर्चा काढत अटकेची व मकोका लावण्याची मागणी केली असून एसआयटीकडून चौकशी सुरू आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 10, 2026 | 05:23 PM
विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेच्या मागणीसाठी केजमध्ये मोर्चा

विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेच्या मागणीसाठी केजमध्ये मोर्चा

Follow Us
Follow Us:
  • विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्रावर गंभीर आरोप
  • केजमध्ये अटक व मकोकाच्या मागणीसाठी मोर्चा
  • एसआयटी चौकशी सुरू; न्यायासाठी कुटुंबीयांचा लढा कायम
 

बीड जिल्ह्यातील केज येथील विलास घुले हत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिक गाजत असून या प्रकरणात नवे दावे आणि आरोप समोर येत आहेत. विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर विलास घुले यांना मारहाण करत असताना सौरभ बजरंग सोनवणे यांचे नाव घेत होते. हत्येनंतर दाखल केलेल्या तक्रारीतही त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून सौरभ सोनवणे यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

खासदार पुत्राच्या अटकेच्या मागणीसाठी केजमध्ये मोर्चा

विलास घुले हत्या प्रकरणाला दोन आठवडे उलटूनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी केज शहरात मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोर्चेकऱ्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला तातडीने अटक करावी, तसेच या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली. पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव दिले असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप; ‘खऱ्या सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न’

विलास घुले यांचे नातेवाईक रमेश घुले यांनी मोर्चादरम्यान आरोप केला की, खासदार पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आरोपींना राजकीय संरक्षण दिले जात आहे. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

एसआयटी चौकशी सुरू; न्यायाच्या मागणीवर कुटुंबीय ठाम

या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून सौरभ सोनवणे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, विलास घुले यांच्या हत्येनंतर न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.

आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर सुमारे ११ तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले आणि विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आरोपींवर कठोर कारवाई आणि न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका कुटुंबीयांनी कायम ठेवली आहे.

Web Title: Vilas ghule murder case kej protest bajrang sonawane son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • Beed News

संबंधित बातम्या

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…
1

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू
2

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू

Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण
3

Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी
4

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.