Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Assembly bypoll Election 2026 : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 4 मे ला निकाल होणार जाहीर

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 23, 2026 | 11:47 AM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Follow Us:

Baramati Assembly bypoll Elections 2026 : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे सुनेत्रा यांचा विक्रमी विजय अपेक्षित आहे. अजित पवरांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

या मतदानासाठी शरद पवार हजर नसतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे. यावर शरद पवार म्हणाले, १९६७ मधील माझ्या पहिल्या निवडणुकीपासून मी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नाही. ढासळत्या प्रकृतीमुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

बंगालात पहिला टप्पा, तामिळनाडूतही व्होटिंग

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात आणि तामिळनाडूमध्ये सर्व विधानसभा जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

काँग्रेसची पोटनिवडणुकीतून माघार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीकरांच्या भावनांचा आदर करत बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अखेर माघार घेत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली होती.

अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवाजीराव कर्डिले आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार दिला होता. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करण्यात आले.

हे देखील वाचा :  देशातील पाच राज्यांचे ‘सरकार’ बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; कधी अन् किती टप्प्यांत होणार मतदान?

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Web Title: Voting today for baramati and rahuri assembly by elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • Baramati by-election
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Ashok Gehlot: ‘सोनिया गांधींनी अध्यक्ष केले असते तर मी नकार दिला असता का? तो एक मोठा कट होता…’, अशोक गेहलोत यांचे खळबळजनक विधान
1

Ashok Gehlot: ‘सोनिया गांधींनी अध्यक्ष केले असते तर मी नकार दिला असता का? तो एक मोठा कट होता…’, अशोक गेहलोत यांचे खळबळजनक विधान

नगरसेवक किशोर मासाळ राजीनामा द्या, अन्यथा…; बारामती राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा इशारा
2

नगरसेवक किशोर मासाळ राजीनामा द्या, अन्यथा…; बारामती राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा इशारा

मोठी बातमी ! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान केली ‘ही’ महत्त्वाची विनंती
3

मोठी बातमी ! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश
4

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.