Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दहशतीचे राजकारण करणाऱ्यांविरोधात ठामपणे आवाज उठवणार’; रोहित पवारांचे मंत्री गोरेंना प्रत्युत्तर

तसेच राज्यात अनेक गुंड गुन्हे करूनही तुरुंगाच्या बाहेर राहतात आणि साताऱ्यात मात्र सत्तेच्या जोरावर विनाकारण काही लोकांना त्रास दिला जात आहे. एका प्रकरणात तुषार खरात यांना जामीन मिळाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2025 | 07:43 AM
'भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर...'; रोहित पवारांचं मोठं विधान

'भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर...'; रोहित पवारांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून कुरबुरीचे राजकारण करायचे आणि दहशतीचे राजकारण शासकीय यंत्रणेला हाती धरून करायचे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे बोलतच राहणार. तुषार खरात प्रकरण आणि संबंधित महिलेला जो काही त्रास झाला त्याचे सत्य लवकरच बाहेर येईल, असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिले.

विधानपरिषदचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात पवार यांनी केलेल्या टिपणीबद्दल मंत्री गोरे यांनी रोहित पवार यांनी रामराजेंची वकिली करू नये, अशी टीका केली होती. या टीकेला साताऱ्यात रोहित पवार यांनी जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, ‘दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही बोलत राहणार. ते जे बोलतील म्हणजे झालं का? पोलिसांना घरगड्यासारखं काम करू नये. दिवस सारखे राहत नाहीत, अशी आठवण करून देत रोहित पवार म्हणाले, पोलिसांनी वर्दीत राहून दुसऱ्याला धार्जिणे काम करणे योग्य नाही. हा चुकीचा प्रकार सुरू आहे.

तसेच राज्यात अनेक गुंड गुन्हे करूनही तुरुंगाच्या बाहेर राहतात आणि साताऱ्यात मात्र सत्तेच्या जोरावर विनाकारण काही लोकांना त्रास दिला जात आहे. एका प्रकरणात तुषार खरात यांना जामीन मिळाला आहे. संबंधित महिलेला ही जामीन मिळेल, या प्रकरणात पोलिसांकडून दबाव आणण्याचे काम होत आहे. त्यांनी पदाचा उपयोग विकासासाठी करावा. पोलिसांना घेऊन दडपशाही करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आम्ही वकिलांच्या संपर्कात आहोत

पवार पुढे म्हणाले, ‘आम्ही वकिलांच्या संपर्कात आहोत. त्यानंतर आम्ही लोकात जाणार आहोत. दोन राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या संदर्भात त्यांना विचारले असता केवळ या चर्चा आहेत, असे त्यांनी खंडन केले. पवार घराण्यातील ज्येष्ठ एकमेकांशी संवाद साधतील हे त्यांचे काम आहे. या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कदाचित दिवाळीनंतर होतील’, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will raise voice firmly against those who engage in politics of terror says mla rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 07:43 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • rohit pawar
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.