
अधिवेशनाचा आठवडा ठरेल लक्षवेधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच सोमवारपासून विधीमंडळात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले दिसेल. सरकारमध्ये स्थानिक निवडणुकीवरून उफाळलेला अंतर्गत वाद आणि वर्षपूर्तीनिमित्त स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारचे घोटाळे वेशीवर टांगण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे.
गेल्या वर्षी सरकारचा शपथविधी झाला होता. त्यास याच अधिवेशनकाळात एक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे सरकारची यानिमित्ताने परीक्षाच असेल. अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य रविवारी दुपारपर्यंत नागपुरात दाखल होणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठांना डावलले गेले होते. मुंबईतील अधिवेशनात याचे पडसादही उमटले. सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांनी नंतरच्या काळात नाराजीचा सूर उमटविला.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात का आयोजित केले जाते? काय आहे त्यामागचा रंजक इतिहास
उलटपक्षी, विरोधकही सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे एकसंघ नाही. त्यातच मनसेची होऊ घातलेल्या ‘एन्ट्री’ने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस सध्या एकाकी दिसत असून, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार व मनसे दुसऱ्या बाजूला दिसत आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच बंपर बहुमतामुळे सरकारची हुकुमशाहीपणा यावर विरोधक किती आक्रमक होईल, याकडेही नजरा असेल.
विरोधी पक्षनेतापदाचा मुद्दा चर्चेला
विरोधी पक्षनेतापदाचा मुद्दाही या अधिवेशनात चर्चेला असेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सरकारची भूमिका, लाडकी बहीण योजनेवरून अस्वस्थता, बेरोजगारी, गुंतवणूकीचे फसवे आकडे यावरही विरोधक हातात बॉम्ब घेऊन सज्ज असेल
उद्धव ठाकरे दोन दिवस नागपुरात
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरूवार, ११ आणि शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. ते केवळ दोन दिवस सहभागी होणार असून, या दोन दिवसांत ते महत्त्वपूर्ण चर्चा, पक्षीय बैठक आणि आमदारांशी संवाद साधणार आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेला होणार, ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार