
Chhatrapati Sambhajinagar : 'शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा' : इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर : “जिथे मी मतदानाचा हक्क बजावला आहे, तिथे लाईटची सुविधा नाही. पाच वर्षांनंतर निवडणूक येते आणि लोकांना चार आपले निशाणी, चार नावे शोधून मतदान करावे लागते. त्यांना काही अडचण येऊ नये, यासाठी इलेक्शन कमिशनने दक्षता घ्यायला हवी होती. लाईटची सुविधा असणे आवश्यक होते. दुर्दैवाने काही ठिकाणी ती नव्हती. निवडणूक कशी चालली आहे, हे आपल्याला माहिती आहे; तरीही मी लोकांना आवाहन करतो की, जास्तीत जास्त मतदान करा, पण मतदान कोणाला करायचे ते तुम्ही ठरवा. कृपया शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन जलील यांनी केले.
इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘बहुतेक सत्ताधारी पक्षांना यामध्ये फायदा झाला नसेल म्हणून त्यांनी बदल केले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदान होते, पैशांचा वापर होतो, याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तोटे काय आहेत हे लक्षात येते, पण कोणी यावर लक्ष देत नाही. मी स्वतः चौघांनाही मतदान दिले आहे. माझे दोन उमेदवार होते; त्यांना स्वाभाविकच माझ्या पक्षातले आहे. बागेचे दोन उमेदवार वेस्ट करण्याऐवजी मी माझ्या परिसरात चांगले काम करणाऱ्यांना मतदान केले.
हेदेखील वाचा : Municipal Elections : नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; मतदारांमध्ये तीव्र नाराजी
नारेगावमध्ये काल जो राडा झाला, तो एक उमेदवार पैसे देऊन उभा होता, लोकांना पैसे वाटत होते आणि त्यांचे इलेक्शन कार्ड घेत होते. गोरगरिबांच्या बाबतीत खूप फसवणूक झाली. बेगमपूरच्या लोकांना मी सलाम करतो. जेव्हा लोकांनी पैसे घेण्यास नकार दिला, तेव्हा महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी सांगितले की, आम्ही पैसे घेऊन विकणार नाही; कोणीही विकत घेऊ शकत नाही. काल रात्री आणि आज सायंकाळीपर्यंत प्रभाग क्रमांक १४ मध्ये मी पोलीस कमिशनरला नावासहित बाहेरून कोण आले आहे, हे सर्व सांगितले. जे नाव मी दिले होते, त्यांच्यासंदर्भात पोलीस कसे दुर्लक्ष करत आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे.
सीपी साहेबांना आधीच कळवले
मी स्पष्टपणे सांगतो, काही ठराविक प्रभागांमध्ये कोण राडा करणार आहे हे मी सीपी साहेब आणि डीसीबी साहेबांना आधीच कळवले आहे. संध्याकाळी मला विचारले, तेव्हा मी माझा मेसेज दाखवणार आहे. हेच लोक राड्यात सहभागी असतील, असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप