फोटो सौजन्य- pinterest
सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले पवित्र ठिकाण आहे. येथे असलेला सिद्धीविनायक गणपती अष्टविनायक यात्रेतील दुसरे मंदिर मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सिद्धीविनायक प्रसिद्ध आहे. विशेषतः कार्यसिद्धीसाठी येथे भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.
सिद्धटेक सिद्धीविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक अतिशय पवित्र गणपती मंदिर आहे. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यामधील सिद्धटेक गावात भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे. मंदिर टेकडीच्या पायथ्याशी बसलेले असून भोवती सुंदर असा निसर्ग आहे. सिद्धटेकचा गणपती हा सिद्धीविनायक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा आणि सिद्धी देणारा गणपती. अष्टविनायकापैकी एकमेव मंदिर जेथे गणपतीची सोंड उजवीकडेच म्हणजे दक्षिणमुखी आहे. हे अत्यंत शक्तिशाली रुप मानलं जातं. त्याची पूजा करणं देखील तितकच कठीण असतं.
येथील मंदिर दगडी बांधकामात असून त्याची रचना साधी पण प्राचीन शैलीची आहे. भव्यतेपेक्षा इथे शांतता आणि पवित्रता अधिक जाणवते. मंदिर प्राचीन काळापासून पूजास्थान म्हूणून ओळखलं जातं. सध्याच्या मंदिराचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी 18 व्या शतकात केलेले आहे असे अनेक दाखले सांगतात. पेशव्याच्या काळातही या मंदिराला विशेष महत्त्व होतं. अनेक संत आणि भक्तांनी येथे साधना केली असे देखील येथील दाखले सांगतात. असे म्हणतात या मंदिराला सात प्रदक्षणा म्हणजे गिरी प्रदक्षणा घातल्याने खूप पुण्य मिळते. सिद्धटेकच्या सिद्धीविनायकाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊया
ही कथा भगवान विष्णू आणि राक्षसांची संबंधित आहे. सृष्टीच्या सुरुवातीला भगवान विष्णू योगनिद्रेत होते त्यांच्या कानातून मधु आणि कैठक नावाचे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रम्हा यांना त्रास देईला सुरुवात केली. ब्रम्हांनी विष्णूंना जागे केले आणि राक्षसाचा वध करण्यास सांगितले विष्णूंनी युद्ध केलं पण त्यांना काही यश मिळेना. तेव्हा भगवान शिव यांनी सांगितले तू प्रथम गणपतीची उपासना कर. त्यानंतर विष्णूंनी सिद्धेटेक येथे तपश्चर्या करून गणपतीची पूजा केली. गणपती प्रसन्न झाले आणि विष्णूंना सिद्धी दिली. मग विष्णूंनी मधु आणि कैठक राक्षसाचा वध केला यामुळे याला सिद्धटेक आणि गणपतीला सिद्धीविनायक असं नाव पडलं. सिद्धटेकचा सिद्धीविनायक हा अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक गावात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे.
Ans: येथे गणपतीची सोंड उजव्या बाजूला (दक्षिणमुखी) आहे, जी अत्यंत शक्तिशाली आणि जागृत मानली जाते.
Ans: भगवान विष्णूंनी येथे गणपतीची उपासना करून मधु-कैठक राक्षसांचा वध करण्यासाठी सिद्धी प्राप्त केली.






