फोटो सौजन्य- pinterest
रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी बुध आपले नक्षत्र बदलणार आहे. सकाळी १०:४७ वाजता बुध उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सोडून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि २१ सप्टेंबरपर्यंत तो याच नक्षत्रात राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाच्या नक्षत्रातील हा बदल वृषभ, मिथुन आणि सिंह राशींसाठी शुभ परिणाम आणू शकतो. या राशींना आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो. बुधाच्या नक्षत्र बदलाचे या राशींवर होणारे परिणाम जाणून घेऊया.
बुध ग्रहाच्या नक्षत्रातील बदल वृषभ राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकता. या राशीच्या काही लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोतदेखील मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात चांगला काळ अनुभवू शकता. बुधाच्या प्रभावामुळे, या राशीच्या विद्यार्थ्यांची एकाग्रता देखील वाढेल, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असून तो सध्या तुमच्या सुखाच्या घरात आहे. १३ सप्टेंबर रोजी जेव्हा बुधाचे नक्षत्र बदलेल, तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. या राशीच्या लोकांना आदर आणि सन्मान मिळू शकतो. बुधाच्या शुभ प्रभावामुळे धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. विपणन (मार्केटिंग), माध्यम, लेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचा मान्यवरांशी संवाद वाढू शकतो. तसेच या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश.
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध दुसऱ्या घरात संक्रमण करणार आहे. जेव्हा बुध हस्त नक्षत्रातून संक्रमण करतो, तेव्हा तुमच्या कामाला गती मिळू शकते. रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या बोलण्याचा लोकांवर सामाजिक प्रभाव पडू शकतो. काहींना वडिलोपार्जित मालमत्तेचाही फायदा होऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यातही सकारात्मक बदल होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






