संग्रहित फोटो
याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याचा मोठा भाऊ मुझ्झमील (वय ३३, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अस्लम हा रिक्षाचालक असून, तो गॅरेजमध्ये रिक्षा दुरस्तीचे कामे करायचा. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) त्याचा महापालिका काॅलनी क्रमांक दहा परिसरातील एका तरुणाशी वाद झाला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तो काशेवाडी भागातून निघाला होता. चमनशहा दर्ग्याजवळ आरोपी तरुणाने अस्लम याला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून तो पसार झाला.
जखमी अवस्थेतील अस्लम याला चक्कर आली. जखमी अवस्थेत तो घरी गेला. चक्कर आल्याने तो घरात झोपला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी तो झाेपेतून जागा झाला नाही. त्याला कुटुंबीयांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. चौकशीत अस्लम याला एका तरुणाने मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
एकाच रात्री दोन गंभीर घटना
पिंपरीतील ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून ४.२० लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील दोघांचे आणखी एक गंभीर कृत्य उघडकीस आले आहे. व्यापाऱ्याला लुटण्याच्या काही वेळ आधीच या दोघांनी आपल्या एका साथीदारासह काळेवाडीत एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. जुन्या वादातून तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. त्यानंतर कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ans: पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात चमनशहा दर्ग्याजवळ ही घटना घडली.
Ans: अस्लम युसूफ खान (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो रिक्षाचालक आणि गॅरेजमध्ये काम करत होता.
Ans: जुन्या वादातून आरोपीने अस्लम यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत घरी गेलेल्या अस्लम यांचा झोपेत मृत्यू झाला. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.






