संग्रहित फोटो
या बैठकीस जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, वाहतूक व पेट्रोलिंग आराखडा, मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम व निवडणूक साहित्य व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आदेश उल्लंघन, आचारसंहिता भंग, तक्रार अथवा इतर निवडणूक विषयक शंका असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. यासाठी हेल्पलाईन क्रमांक ०२१११–२२३१३४ वर संपर्क साधता येणार असून, तसेच निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांचे समन्वय अधिकारी सुरेश डुबले यांच्या मो. ८८३०८६२४५२ या क्रमांकावरही माहिती अथवा तक्रार नोंदवता येणार आहे.
सुव्यवस्था अबाधित ठेवावी
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. ही आढावा बैठक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी घेतली असून, या निवडणुकीत इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत एकत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करत, दोघांच्या मनोमिलनाचे नवे पर्व घोषित केले आहे. या अनपेक्षित समीकरणामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण लागले असून, भरणे व पाटील या दोन नेत्यांची मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार?, हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.






