फोटो सौजन्य- istock
अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला जेव्हा सापांशी संबंधित स्वप्ने पडतात तेव्हा त्याचे लक्ष विचलित होते आणि स्वप्नात साप दिसणे काय सूचित करत आहे असा विचार करू लागतो. स्वप्नशास्त्रामध्ये सापांशी संबंधित स्वप्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वप्नात सतत दोन साप दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो. स्वप्नात दोन साप दिसणे शुभ की अशुभ हे जाणून घेऊया.
जेव्हा जेव्हा सापाशी संबंधित स्वप्न येते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते. अशी स्वप्ने अशुभ लक्षण आहेत की काय अशी शंका मनात निर्माण होते. स्वप्नशास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नातील शुभ आणि अशुभ परिणामांचे तपशीलवार वर्णन केले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर तुम्हाला स्वप्नात सापांची जोडी दिसली, तर या स्वप्नाचा अर्थ काय आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडणार आहे. स्वप्नात दोन साप दिसणे म्हणजे काय ते जाणून घेऊया.
स्वप्नात सापांची जोडी पाहणे
जर तुम्हाला स्वप्नामध्ये दोन साप दिसत असतील, तर त्याचा अर्थ असा की, विरोध आणि तुमची उर्जा यामध्ये संतुलन राखण्यात तुम्ही सक्षम असाल. याशिवाय हे एक शक्तिशाली ऊर्जा देखील दर्शवू शकते. अशी स्वप्ने असेही सूचित करतात की, तुमच्या मनात काही गोष्टींबाबत गोंधळ आहे.
स्वप्नात दोन पांढरे साप दिसणे
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात दोन पांढऱ्या रंगाचे साप दिसले तर ते तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद देणार असल्याचे लक्षण आहे. याशिवाय पांढऱ्या रंगाचा साप दिसणे हेदेखील सूचित करते की तुमच्या जीवनात सुख-समृद्धी वास करणार आहे. तसेच पैशाची आणि धान्याची कमतरता भासणार नाही.
स्वप्नात काळे साप पाहणे
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसला ज्याचा फणा उंचावलेला असतो, तर स्वप्न शास्त्रानुसार अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमीदेखील मिळू शकते.
स्वप्नात दोन साप दिसणे
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात सलग दोन साप दिसत असतील, तर अशा स्वप्नाचा अर्थ तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा कालसर्प दोष असू शकतो. म्हणून जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात. तेव्हा तुम्ही तुमच्या पितरांच्या शांतीसाठी पूजा अवश्य करावी.
स्वप्नात साप चावणे
जर तुम्हाला स्वप्नात साप चावला असेल, तर याचा अर्थ तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. ज्यांना संततीप्राप्तीची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वप्नशास्त्रानुसार अशा प्रकारचे स्वप्न तुमच्यासाठी शुभ सिद्ध होते.
स्वप्नात बरेच साप दिसणे
जर तुम्हाला स्वप्नात खूप साप दिसले, तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही मोठे संकट येणार आहे. जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात तेव्हा त्यावर उपाय म्हणून तुम्ही भगवान शंकराची पूजा करावी. तसेच नाग गायत्री मंत्राचा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा.