Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र, दुर्वा नेमक्या कुठे वाहाव्यात, याबाबत अनेकांना माहिती नसते. दिलेल्या पौराणिक कथेनुसार, दुर्वा बाप्पाच्या पायांऐवजी डोक्यावर अर्पण कराव्यात, असे सांगितले जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 12:30 PM
Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणपतीला दुर्वा डोक्यावर अर्पण करण्याची परंपरा आहे.
  • अनलासुराला गिळल्याने बाप्पाच्या शरीरात दाह निर्माण झाला.
  • कश्यप ऋषींनी बाप्पाला २१ दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या.
  • दुर्वांमुळे बाप्पाचा दाह शांत झाला, अशी पौराणिक मान्यता आहे.
Why Durva is Offered to Ganesha: 14 ते 25 सप्टेंबर, भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव आहे. या दिवसात आपण सगळेच बाप्पाच्या दर्शनाला जातो, घरी पूजा करतो आणि दुर्वा वाहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण दुर्वा नेमक्या कुठे वाहतो? बहुतेक लोक दुर्वांची जुडी घेतात आणि सरळ बाप्पाच्या पायावर ठेवतात. पण शास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे. दुर्वा पायावर नाही वाहायची. ती डोक्यावर वाहायची असते. का? त्यामागे एक मोठी पौराणिक कथा आहे. Ganeshotsav 2026:

अनलासुराची गोष्ट आणि दुर्वांचं महत्त्व

खूप वर्षांपूर्वी अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो इतका भयंकर होता की त्याच्या तोंडातून सतत आग बाहेर पडायची. त्या आगीने सगळे ऋषी, देव आणि सामान्य माणसं भाजून निघत होते. सगळीकडे हाहाकार माजला होता.तेव्हा सगळ्या देवांनी गणपती बाप्पाकडे धाव घेतली आणि वाचवा म्हणून प्रार्थना केली. बाप्पाने मग सगळ्यांच्या रक्षणासाठी त्या अनलासुराला गट्टम करून पोटातच घेतलं.राक्षसाला पोटात घेतल्यावर काय झालं, त्याच्या शरीरातल्या आगीमुळे बाप्पाच्या पोटात आणि अंगात प्रचंड जळजळ सुरु झाली. बाप्पाचा दाह वाढला. देवांनी बाप्पाला थंड करण्यासाठी चंद्र आणला, चंदनाचा लेप लावला, पण काहीच फरक पडेना.

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

बाप्पाची आग शांत होईना.शेवटी कश्यप ऋषी आणि त्यांच्यासोबत 88 हजार ऋषींनी एक उपाय केला. प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी बनवली आणि बाप्पाच्या डोक्यावर ठेवली. दुर्वा थंड असते, औषधी असते. तिच्या स्पर्शाने बाप्पाच्या शरीरातली सगळी जळजळ क्षणात शांत झाली. बाप्पाला एकदम शांत वाटलं.तेव्हा बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणाले, जो कोणी मला दुर्वा वाहील, त्याच्यावर मी नेहमी खुश राहीन.

मग दुर्वा कुठे वाहायची?

या कथेतूनच आपल्याला कळतं की दुर्वा का आणि कुठे वाहायची.बाप्पाचा दाह शांत करण्यासाठी दुर्वा डोक्यावर ठेवली होती, पायावर नाही. म्हणून दुर्वा नेहमी बाप्पाच्या मस्तकावर किंवा कानाजवळ ठेवावी.जर मूर्ती मोठी असेल आणि डोक्यावर दुर्वा ठेवता येत नसेल, तर 21 किंवा 108 दुर्वांची जुडी करून त्याचा हार बनवून बाप्पाच्या गळ्यात घालावा.पायावर फुलं वाहायची असतात, दुर्वा नाही. दुर्वा ही बाप्पाचं डोकं थंड करणारी वनस्पती आहे, म्हणून तिला डोक्यावरच मान आहे.

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

21 दुर्वा आणि तीन पानांचं रहस्य काय?

दुर्वा घेताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा. दुर्वाला नेहमी तीन पानं असतात. याला त्रिदल म्हणतात. ही तीन पानं माणसातल्या तीन गुणांची – सत्व, रज, तम यांची प्रतीकं आहेत.आणि जुडी नेहमी 21 दुर्वांचीच का करतात? कारण 21 हा आकडा बाप्पाला खूप प्रिय आहे. आपल्या शरीरातली 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, 5 महाभूते आणि 1 मन मिळून 21 होतात. म्हणून 21 दुर्वांची जुडी बाप्पाला वाहतात.तर या गणेशोत्सवात जेव्हा तुम्ही बाप्पाची पूजा कराल, तेव्हा ही छोटीशी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दुर्वा पायावर न टाकता हाताने प्रेमाने बाप्पाच्या डोक्यावर ठेवा. बाप्पा नक्कीच प्रसन्न होईल.

Web Title: Ganesh festival 2026 why durva grass is offered on lord ganeshas head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • hindu religion
  • Marathi News
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
2

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
3

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक
4

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.