फोटो सौजन्य- pinterest
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार, 27 ऑगस्ट रोजी झाली आहे. हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. या वर्षी अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या 10 दिवसांच्या उत्सवामध्ये पूजा-पाठ आणि मंत्रजप केले जाते. विसर्जन हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची पूजा देखील केली जाते.
अनंत चतुर्दशीची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.14 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1.41 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार अनंत चतुर्दशीचा सण यावेळी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे.
अनंत चतुर्दशी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर भाविक भक्तिभावाने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे नदी, तलाव किंवा कोणत्याही जलाशयात विसर्जन करतात. विसर्जन हा एक फक्त धार्मिक विधी नसून सांस्कृतिक श्रद्धा देखील आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने बाप्पाचे भक्तांवर आशीर्वाद राहतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
मात्र काही लोकांना 10 दिवस गणपती बाप्पा बसवणे शक्य नसते अशा वेळी दीड, पाच, सात या दिवसांत बाप्पाचे विसर्जन केले जाते. तुम्ही सुद्धा या कोणत्याही दिवसात बाप्पाचे विसर्जन करणार असाल तर यावेळी हे उपाय करायला विसरु नका. हे उपाय केल्याने कुंडलीमधील बुध ग्रह देखील बलवान होतो.
विसर्जनापूर्वी बाप्पाची आरती करुन उत्तर पूजा करुन घ्यावी.
त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्या नंतर बाप्पाच्या गम गणपतये नम: या मंत्रांचा जप करा.
नंतर तांदूळ, फुले, धूप आणि पैसे या गोष्टी बाप्पाला अर्पण करा.
वरील सर्व गोष्टी झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि झालेल्या चुकीबद्दल माफी मागा. त्यानंतर विसर्जन करा.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या काळात बाप्पाला लाल फुले अर्पण केल्याने मानसिक शांती देखील मिळते.
बाप्पाच्या विसर्जनापू्र्वी चार नारळ एकत्र करुन त्याचा हार तयार करुन तो अर्पण करा म्हणजे तुमची बिघडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.
गणपती विसर्जनाच्या दिवशी कच्च्या रेशमी धाग्याच्या सात गाठी बांधा आणि त्यानंतर जय गणेश कटो कलेश मंत्राचा जप करुन तो धागा तु्मच्याजवळ ठेवा. ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)