Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganga Saptami 2026 Daan: नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र?

असं म्हणतात की, पापांचा नाश करायचा असेल तर गंगास्नान केल्याने पुण्या लाभतं. याच गंगा सप्तमीला राशीनुसार कोणत्या व्यक्तींना काय दान करावं हे सांगितलं आहे. याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 02:31 PM
Ganga Saptami 2026 Daan: नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र?
Follow Us
Follow Us:
  • नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान,
  • जाणून घ्या काय सांगतं शास्त्र ?
Ganga Saptami 2026 Daan: हिंदू धर्मात गंगेला मोठं महत्व आहे. गंगा नदी म्हणजे देवीमातेचं स्वरुप मानलं जातं. पुराणानुसार असं मानलं जातं की, हिंदू गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण ही राजा भगीरथाच्या कठोर तपस्येची आणि भगवान शिवाच्या कृपेची कथा आहे. याला ‘गंगावतरण’ असेही म्हणतात. हाच दिवस गंगा सप्तमी म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की, पापांचा नाश करायचा असेल तर गंगास्नान केल्याने पुण्या लाभतं. याच गंगा सप्तमीला राशीनुसार कोणत्या व्यक्तींना काय दान करावं हे सांगितलं आहे. याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊयात.

गंगा सप्तमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी गंगा सप्तमी 23 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, किंवा आपल्या राशीनुसार शुभ दिवशी शुभ वस्तूंचे दान केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम शांत होतात आणि जीवनात सुख, समृद्धी व शांती लाभते.

ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ दिवशी आपल्या राशीनुसार शुभ वस्तूंचे दान केल्याने ग्रहांचे विकार शांत होतात आणि जीवनात सुख, समृद्धी व शांती लाभते. पण लक्षात ठेवा की प्रत्येक राशीचा एक अधिपती ग्रह असतो आणि जेव्हा त्या ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान केले जाते, तेव्हा तो ग्रह शांत आणि बलवान होतो. गंगा सप्तमीला आपल्या राशीनुसार भक्तिभावाने दान केल्याने आत्मशुद्धी होते आणि तुमच्या कुंडलीतील दुर्बळ ग्रहांना बळकट करून शुभ-भाग्य प्राप्त होते.

पाऊस कधी पडणार हे सांगणारं रहस्यमय मंदिर; विज्ञानालाही चकित करणारं कोडं

मेष – मेष राशीच्या मंडळींनी गंगा देवीची पूजा करा आणि गरजूंना लाल वस्त्रे दान करा.

वृषभ – शुक्राच्या अंमलाखाली असलेल्या या मंडळींनी तांदूळ, साखर आणि पांढरे कपडे दान करणे अत्यंत शुभ ठरेल.

मिथुन – मूग आणि हिरव्या भाज्या दान केल्याने तुमच्या पापांचे निवारण होण्यास मदत होईल.

कर्क – तुमचा राशीस्वामी चंद्र आणखीनच बलवान करण्यासाठी दही आणि साखर दान केल्याने तुमचे मन शांत होईल.

सिंह – गहू, मका आणि गूळ दान केल्याने शुभ परिणाम मिळू शकतात.

कन्या – गायीची सेवा केल्यानंतर, गोशाळेला हिरवा चारा किंवा चाऱ्यासाठी पैसे दान करा.

तूळ – पांढरे कपडे आणि तांदूळ दान केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो.

वृश्चिक – लाल कपडे आणि डाळ दान करा.

धनु – हरभरा डाळ आणि बेसन दान केल्याने शुभशकुन मिळू शकतो.

मकर – खिचडी बनवून भुकेल्यांना खाऊ घातल्याने तुमची पापे कमी होण्यास मदत होईल.

कुंभ – छत्री, कपडे आणि चामड्याचे बूट दान केल्याने शनीचा प्रभाव कमी होऊ शकतो.

मीन: पिवळे कपडे आणि हिरवा पिठा लाडू दान केल्याने तुम्हाला शुभशकुन मिळू शकतो.

गंगा सप्तमीला काही मंत्रांचा जप करा.

गंगा मंत्र: या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते. मन शुद्ध होते.

‘ॐ नमः शिवायै गंगायै शिवदया नमो नमः।’

गंगा स्तोत्र मंत्र: या मंत्राचा जप केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते.

‘देवि सुरेश्वरी भगवति गंगे त्रिभुवन तारिणि तरल तरंगे।’
‘शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदयुगमे॥’

Durvasa Shap: दुर्वासा ऋषींच्या क्रोधाने थरथरले होते वैकुंठ, असा ‘शाप’ ज्यामुळे भगवान विष्णूलाही व्हावे लागले सामान्य मानव!

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

 

Web Title: Ganga saptami 2026 daan luck will be bright donate according to your zodiac sign on ganga saptami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • spiritual

संबंधित बातम्या

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर Share Market मध्ये कमबॅक! Sensex Nifty तेजीत, बँकिंग स्टॉक्सच्या जोरावर बाजार वधारला
1

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर Share Market मध्ये कमबॅक! Sensex Nifty तेजीत, बँकिंग स्टॉक्सच्या जोरावर बाजार वधारला

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
2

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

‘या’ Multibagger स्टॉकवर Motilal Oswal फिदा! 5 वर्षांत दिला तब्बल 690% पेक्षा जास्त रिटर्न; आता नवीन टार्गेट जाहीर
3

‘या’ Multibagger स्टॉकवर Motilal Oswal फिदा! 5 वर्षांत दिला तब्बल 690% पेक्षा जास्त रिटर्न; आता नवीन टार्गेट जाहीर

ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची हवा! IPO रिलीज होण्याआधीच 152 रुपयांवर पोहोचला प्रीमियम; लिस्टिंगच्या वेळी मिळणार मोठा नफा?
4

ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची हवा! IPO रिलीज होण्याआधीच 152 रुपयांवर पोहोचला प्रीमियम; लिस्टिंगच्या वेळी मिळणार मोठा नफा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.