फोटो सौजन्य- pinterest
दिवाळी हा सनातन धर्माचा एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. मान्यतेनुसार भगवान राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येमध्ये लोकांनी दिवे लावले आणि संपूर्ण शहर रोषणाईने सजवले आणि तेव्हापासून दिवाळी हा दिवे आणि रोषणाईचा सण बनला आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, राम दरबार आणि कुबेर देवता यांची योग्य पद्धतीने पूजा केली जाते, जेणेकरून घरात धन, सुख आणि समृद्धी राहते.
दिवाळी हा सांस्कृतिक उत्सव नसून आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या त्याला खूप महत्त्व आहे. या दिवसाला कालरात्री म्हणून देखील ओळखले जाते. तांत्रिक पद्धती आणि विशेष विधी पूर्ण करण्यासाठी शुभ मानले जाते. दिवाळी सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी हंस महापुरुष राजयोग देखील तयार होणार आहे. त्यामुळे या दिवसांचे आणखी महत्त्व वाढते. हंस महापुरुष राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
पंचांगानुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी अमावस्येची सुरुवात 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.44 वाजता होईल आणि 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.55 पर्यंत राहील. अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात येत आहे, म्हणून या दिवशी दिवाळी साजरी करणे शुभ मानले जाते आणि शास्त्रांनुसार. जर प्रतिपदा तिथी त्याच दिवशी संध्याकाळी सुरू झाली असती, तर पाच दिवसांच्या दिवाळी सणाचे महत्त्व गेले असते. 20 ऑक्टोबरचा दिवस हा खूप खास मानला जातो.
या वर्षी दिवाळीच्या दिवशी हंस महापुरुष राजयोग नावाचा एक विशेष आणि शुभ योग तयार होत आहे. गुरु ग्रह त्याच्या उच्च राशीत असल्याने कर्क राशीत असताना हा योग तयार होत आहे. गुरुचे हे संयोजन खूप शुभ मानले जाते. तर व्यक्तीच्या जीवनात संपत्ती, ज्ञान, आदर आणि समृद्धी आणते. दिवाळीसारख्या पवित्र सणाला या राजयोगस तयार होत असल्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व वाढत आहे.
मिथुन राशीच्या लोकांचा या काळामध्ये करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. तसेच आर्थिक समस्या दूर होतील. गुंतवणुकीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश होईल. जर तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करायचे असल्यास हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
गुरु ग्रहाचे हंस महापुरुष राजयोग तयार होईल. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे स्त्रोतत तयार होतील. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. तुम्ही नवीन प्रकल्प किंवा गुंतवणुकीची योजना आखत असल्यास हा काळ अनुकूल राहील. तुमचे कुटुंब आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे. प्रलंबित पेमेंट किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय करारांमुळे मोठा नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्यांसह पदोन्नती मिळू शकते. सामाजिक दर्जाही वाढेल.
मकर राशीच्या हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. नवीन करार किंवा गुंतवणूकीसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये वेगाने प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)