सकाळी उठल्यानंतर अनेकांना ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी कॅफिन असलेल्या पेयांचे सेवन करण्याऐवजी गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा. गोकर्णाच्या फुलांचा चहा ब्लू टी म्हणून सुद्धा ओळखला जातो. यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतात. या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गोकर्णाच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

गोकर्णाच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करून त्यात गोकर्णाची ५ ते ६ घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग पूर्णपणे निळा होऊन जाईल. त्यानंतर पाणी गाळून त्यात लिंबाचा रस मिक्स करा.

संधिवात किंवा सांधेदुखीपासून त्रास असलेल्या व्यक्तींना दिवसभरातून एकदा गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा. या चहामुळे थंडीच्या दिवसांमध्ये सांध्यात वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते.

गोकर्णाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह इत्यादी आवश्यक घटक असतात. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि शरीराला आवश्यक घटक मिळतात.

त्वचेवरील तेज आणि चमक वाढवण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचा चहा खूप जास्त फायदेशीर ठरतो. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी नियमित चहाचे सेवन केल्यास महिनाभरात त्वचेवर चमकदार ग्लो येईल.

शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी गोकर्णाचा चहा फायदेशीर ठरतो. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठी गोकर्णाचे चहा पिणे गुणकारी मानले जाते.






