शहर वासियांना राणभाज्यांची चव आणि राणभाज्यांचे आरोग्यासाठी असणारे महत्व व फायदे कळावेत यासाठी लातूर शहरात राणभाजी महोत्सव घेण्यात आलाय. जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राणभाजी महोत्सवत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेत विविध प्रकारच्या राणभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या राणभाजी महोत्सवाला लातूरकरांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून जिल्हा परिषदेच्या वतीने महिलांसाठी अश्या महोत्सवाचे आयोजन पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा आणि कृषी सभापती यांनी दिलीय. या मोहात्सवात सहभागी महिलांनी उखाणे घेत हा महोत्सव साजरा केलाय तर या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी.