फोटो सौजन्य- सोशल मीडिया
औक्षण हा संस्कृत शब्द आहे. आयुष्य वृद्धीसाठी औक्षण केले जाते. सकारात्मक शक्ती दीपकज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात आणि ज्यांचे औक्षण करत आहोत त्याचे संरक्षण करतात, अशी धारणा आहे. विधानसभा निवडणुका जवळ येताच प्रचाराची जोरदार सुरुवात झाली होती. प्रचार करण्यासाठी उमेदवार घरोघरी जात होते तेव्हा त्याचे औक्षण केले जाते. औक्षणाचे महत्त्व, ते कधी करावे? औक्षण कसे करावे? ते जाणून घेऊया
औक्षण हा शब्द संस्कृत ‘उक्ष्’ म्हणजेच वृध्दी होणे, बलवान होणे या धातूपासून बनलेला असून औक्षण हे आयु: अर्थात आरोग्य वृध्दीसाठी केले जाते. औक्षणाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे दिवा लावून एखाद्या व्यक्तीला ओवाळणे. कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना औक्षण करतात. विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या अध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दिपज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात म्हणून औक्षण केले जाते असे म्हणतात.
रत्न शास्त्र संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
निवडणूक प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा आणि गळ्यात हार असलेले दिसून येत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. तसेत ते जिंकून आल्यावर गुलाल उधळून, फटाके फोडून त्यांचे औक्षण केले जाते. त्यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. उमेदवारांच्या औक्षणाचा हा प्रकार काही नवा नसला; तरी सध्या त्याचे प्रमाण अधिकच वाढलेले दिसते.
मध्ययुगीन काळात लढाईला जाण्यापूर्वी राजा-महाराजांचे शाही थाटामध्ये औक्षण केले जात असे. आजही कुठल्याही कामगिरीवर निघालेल्या व्यक्तीचे औक्षण करून त्याला यश मिळावे, ही शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. थोडक्यात, हा संस्कृतीचा भाग म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवारही त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविण्यासाठी निघालेला असतो.
वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी औक्षणाची मदत घेतली जाते असे ही म्हणतात. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून, सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते. औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात. म्हणजेच अग्नीतत्वात या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकण्याचे काम या औक्षणासाठी प्रज्वलित केलेले निरांजन करत असते म्हणतात.
औक्षणामध्ये एका तबकात तेलाचे निरांजन, हळद कुंकू, अखंड तांदुळाच्या अक्षता, एक अखंड सुपारी आणि एक सुवर्णालंकार (छोटी अंगठी ) या वस्तु घेतल्या जातात. औक्षणार्थीस प्रथम कुंकुमतिलक करावा. त्यानंतर मस्तकावर अक्षता ठेवाव्या (औक्षणार्थीच्या मस्तकावर टोपी किंवा रुमाल असावा). त्यानंतर सुपारी प्रथम मस्तकास लावून, ती ‘उजवी’ कडून ‘डावी’ कडे सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावी(फिरवावी). नंतर ‘सुवर्णालंकार’ मस्तकास लावून तो ‘डावी’ कडून ‘उजवी’ कडे सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावा नंतर तबकासह निरांजन सुध्दा सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावे.