फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना सप्टेंबर महिन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यामध्ये ग्रह मोठ्या प्रमाणात संक्रमण करणार आहे. तसेच या महिन्यात दसरा, दिवाळी यांसारखे विशेष सण येत आहेत. पंचांगानुसार, ऑक्टोबरमध्ये शुक्र एकदा किंवा दोनदा नाही तर चार वेळा संक्रमण करणार आहे. शुक्राला संपत्ती, विलासी जीवन, आनंद, सौंदर्य आणि सन्मान देणारा मानले जाते. 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.12 वाजता शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आपले संक्रमण करेल. तर 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.55 वाजता शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी तो संपूर्ण महिना तिथेच राहील. दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.25 वाजता शुक्र हस्त नक्षत्रात संक्रमण संक्रमण करणार आहे. त्यासोबतच 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.17 वाजता शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात ग्रहाच्या 4 वेळा संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना अपेक्षित लाभ होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे फायदा, जाणून घ्या
शुक्र ग्रहामुळे मेष राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. बरीचशी कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरी करणाऱ्या लोकांचा मूड चांगला राहील आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच ते मनापासून कामे देखील करतील. जे लोक बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे लग्न निश्चित होऊ शकते. विवाहित लोक त्यांचे नाते अधिक मजबूत होत असल्याचे पाहून आनंदी होतील.
धनु राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना विरोधकांना सामोरे जावे लागणार नाही, उलट ते तुमच्याशी मैत्री करण्याचा विचार करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. जर वृद्ध व्यक्ती कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल.
ऑक्टोबर महिन्यात चार वेळा शुक्र ग्रहाचे होणारे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. विरोधकांच्या शांततेमुळे व्यावसायिकांना मानसिक शांती मिळेल. तरुणांसाठी ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा या काळात फायदा होईल. समाजात एक नवीन ओळख मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. प्रेम जीवनाच्या बाबतीत हा काळ विवाहित लोकांच्या हिताचा असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)