Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kanya Pujan: कन्या पूजनाच्या वेळी देऊ नका या भेटवस्तू, कोणत्या गोष्टी देणे शुभ अशुभ जाणून घ्या

नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा करुन त्यांना जेवण देऊन भेटवस्तू दिल्या जातात. कन्या पूजन कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2025 | 03:34 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचे 9 दिवस हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या या काळामध्ये देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. एका वर्षात चार नवरात्र असतात. त्यापैकी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी देवीच्या 9 रुपांच्या पूजेसोबत 9 दिवस उपवास देखील केला जातो. या नऊ दिवसांपैकी आठव्या आणि नवव्या दिवशी कन्या पूजन केले जाते. कन्या पूजनाच्या वेळी लोक अनेकदा मुलींना खास भेटवस्तू देतात. कन्या पूजनाच्या वेळी मुलींना कोणत्या वस्तू भेट देणे शुभ मानले जाते आणि कोणत्या अशुभ ते जाणून घ्या

कन्या पूजनाचा मुहूर्त

अष्टमी तिथीच्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी सकाळी 5.14 ते 6.13 पर्यंत असेल. तर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.41 ते दुपारी 12.11 पर्यंत असेल. तसेच नवमीला कन्या पूजनाचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 5.1 ते 6.14 पर्यंत असेल. दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 2.9 ते 2.57 पर्यंत असेल.

कसे केले जाते कन्या पूजन

कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या मुलींचे प्रथम पाय धुतले जातात. त्यानंतर, त्यांना स्वच्छ आसनावर बसवले जाते. त्यानंतर त्यांच्या कपाळावर तिलक लावला जातो. ते त्यांच्या हातावर एक पवित्र धागा बांधतात. नंतर त्यांना जेवण दिले जाते. या दिवशी मुलींना हलवा, पुरी आणि चणे द्यावेत. त्यानंतर, त्यांना भेटवस्तू किंवा दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या.

Dussehra 2025: दसऱ्याला शमीच्या पानांची पूजा करणे का आहे खास, यामागील कारणे जाणून घ्या

कन्या पूजनाचे काय आहे धार्मिक महत्त्व

नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. हे नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी केले जाते. यावेळी लहान मुलींना जेवण देऊन भेटवस्तू दिल्या जातात. मान्यतेनुसार यावेळी देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. मुलीची धार्मिक विधीनुसार देवी म्हणून पूजा केली जाते.

कन्यापूजेदरम्यान ही भटवस्तू देऊ नका

नवरात्रीच्या काळात कन्या पूजनाच्या वेळी मुलीला आईसारखे वागवले जाते आणि तिला जेवू घातले जाते, परंतु तिला कधीही रिकाम्या हाताने पाठवले जात नाही. तिला नेहमीच काही ना काही भेटवस्तू दिली जाते. जर तुम्हीही मुलीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू किंवा स्टीलची भांडी, काचेच्या वस्तू किंवा चाकू, कात्री किंवा कोणत्याही धारदार वस्तू इत्यादी गोष्टी मुलींना देऊ नयेत.

Ashwin Purnima 2025: अश्विन पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र

कन्या पूजेदरम्यान या गोष्टी भेटवस्तू म्हणून द्या

नवरात्रीतमध्ये कन्या पूजनाच्या वेळी भेटवस्तू द्यायची झाल्यास या वस्तू भेट म्हणून देवू शकतात. तरुणींना सौंदर्यप्रसाधने आवडत असल्याने, त्यांना सौंदर्यप्रसाधने देणे खूप शुभ मानले जाते. तसेच, कन्या पूजनानंतर मुलीला फळे, पुस्तके आणि खेळणी देणे खूप शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kanya pujan 2025 is it auspicious or inauspicious to give these gifts to kanya pujana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Navratri
  • Navratri 2025
  • Navratri festival

संबंधित बातम्या

नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी, नोट करा घ्या रेसिपी
1

नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी, नोट करा घ्या रेसिपी

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो
2

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो

Jwalamukhi Temple : देवीच्या ‘या’ मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे ‘ही’ अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ
3

Jwalamukhi Temple : देवीच्या ‘या’ मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे ‘ही’ अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ

Sharadiya Navratri 2025 : रंग राखाडी; बुद्धीमत्ता आणि साहस देवी कात्यायनीचं महात्म्य
4

Sharadiya Navratri 2025 : रंग राखाडी; बुद्धीमत्ता आणि साहस देवी कात्यायनीचं महात्म्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.