फोटो सौजन्य- pinterest
दसरा किंवा विजयादशमी हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले. दरम्यान हा दिवस फक्त रावण जाळण्यापुरता मर्यादित नसून या दिवशी आजून एक परंपरा जपली जाते. कोणती ती तुम्हाला माहिती आहे का? ती परंपरा म्हणजे शमीच्या पानांची पूजा करणे. शमीच्या पानांची पूजा करणे हे धर्म, पौराणिक कथा आणि ज्योतिष या तिन्ही पैलूंमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि फायदेशीर मानले जाते.
शमीच्या पानांना महाभारत काळापासून खूप महत्त्व आहे. ज्यावेळी पांडव वनवासात गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रे शमीच्या पानाच्या झाडात लपवून ठेवली होती. 12 वर्षांनी ते परत परतले त्यावेळी त्यांना ती शस्त्रे शाबूत असल्याचे आढळले. म्हणून शमीच्या पानांला शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांची आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे.
दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानाची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ही प्रथा प्रचलित आहे. ही परंपरा सोने वाटून घेण्याची म्हणून ओळखली जाते. शमीची पाने सोन्याइतकीच शुभ मानली जातात. ही रोपे घरात ठेवल्याने लक्ष्मी येते. त्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते, असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शमी वृक्ष हा शनि ग्रहाचा प्रिय आहे. दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिचे नकारात्मक प्रभाव शांत होतात आणि करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती नियमितपणे शमी वृक्षाची पूजा करतो, त्याच्या जीवनात स्थिरता येते आणि तो त्याच्या शत्रूंवर विजय मिळवतो.
शत्रूंच्या अडथळ्यांपासून आणि त्रासांपासून मुक्तता
शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावाचे निर्मूलन
घरात आनंद, शांती आणि सौभाग्य वाढेल
धन आणि समृद्धीची प्राप्ती
काम आणि व्यवसायात यश मिळेल.
प्रत्येक क्षेत्रात विजय आणि न्याय
असे म्हटले जाते की, लंकेत रावण शमी वृक्षाची पूजा एका खास पद्धतीने करत असे. म्हणूनच ते युद्ध आणि विजयाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. आजही दक्षिण भारतात दसऱ्याच्या दिवशी लोक शमीच्या झाडाखाली पूजा करतात, त्याला नमन करतात आणि युद्ध किंवा कामाच्या यशासाठी आशीर्वाद घेतात.
दसऱ्याच्या दिवशी केवळ वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण नसून हा सण शक्ती आणि समृद्धीला आमंत्रित करण्याचा एक प्रसंग देखील आहे. या दिवशी शमीची पूजा केल्यानंतर शत्रूंवर विजय मिळविता येतो. तसेच शनिदोषाचा नाश होतो आणि संपत्तीची प्राप्ती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)