Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharat Katha: दुर्योधनाचा अंत आणि अश्वत्थामाची मोठी चूक, महाभारतातील महत्त्वाच्या घटना जाणून घ्या

महाभारतामध्ये दुर्योधन आणि भीम यांच्यात मोठं गदा युद्ध झालं. यामध्ये दुर्योधन जायबंद झाला खरा पण त्याचा शेवट या गदा युद्धामुळे झाला नसून आणखी एका कारणामुळे झाला होता हे कारण नक्की काय आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 15, 2026 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • दुर्योधनाचा अंत आणि अश्वत्थामाची मोठी चूक
  • महाभारतातील महत्त्वाच्या घटना कोणत्या
  • महाभारतामध्ये कोणत्या कथा सांगितल्या आहेत
 

 

हिंदू धर्मात महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांना सर्वांत मोठे स्थान आहे. आजही अनेक राजकीय पंडित, रणनीतीकार, राजकीय चाणक्य या युद्धाचा अभ्यास करून आपले डावपेच आखतात. महाभारत हे द्वापारयुगात घडले होते. कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या महाभारताच्या युद्धात कौरव आणि पांडव एकमेकांच्या विरोधात होते. कौरव अधर्माच्या बाजूने होते तर पांडव धर्माची बाजू सांभाळत होते, असं म्हटलं जातं. श्रीकृष्णाच्या उपस्थितीत झालेल्या महाभारत युद्धादरम्यान अनेक विशेष घटना घडल्या. त्यातून आजही आपल्याला ज्ञान आणि शिकवण मिळते.

भीम-दुर्योधन गदायुद्ध निर्णायक ठरले

महाभारतातील युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भीम आणि दुर्योधन यांच्यात गदायुद्ध झालं होतं. भीम आपल्या गदेने दुर्योधनाच्या शरीरावर सतत प्रहार करत होता. आई गांधारीने डोळ्यांवरची पट्टी काढून दुर्योधनाच्या शरीराकडे पाहिलं होतं. गांधारीच्या दिव्य दृष्टीमुळे दुर्योधनाचं शरीर जणू वज्राइतकं कणखर बनलं होतं. म्हणजे ते इतकं कणखर झालं होतं की कोणताही मार सहन करू शकत होतं. पण गांधारीने सांगूनही दुर्योधन आईला भेटायला जाताना जांघेत वस्त्र परिधान करून गेला होता त्यामुळे जांघेचा भाग वगळता त्याचं सगळं शरीर कणखर झालं होतं. ही बाब श्रीकृष्णाला माहीत होती. महाभारताच्या युद्धात पांडवांना धर्मासाठी मदत करणाऱ्या श्रीकृष्णाने यावेळी सुद्धा मदत व मार्गदर्शन करून पांडवाचे संरक्षण केले होते. श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या जांघेत प्रहार करण्याचा इशारा केला. श्रीकृष्णाकडून इशारा मिळताच भीमाने दुर्योधनाच्या जांघेत प्रहार करण्यास सुरुवात केली. तिथे प्रहार होताच दुर्योधन जखमी झाला.

Mahabharat Katha: द्रौपदी आणि श्रीकृष्णांच्या चातुर्यामुळे पांडव वाचले भीष्मांच्या प्रतिज्ञेतून

अश्वत्थामाची मोठी चूक

भीमाच्या गदा हल्ल्याने दुर्योधन गंभीर जखमी झाला होता. तो वेदनांनी विव्हळत असताना तिथे अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य आले. दुर्योधनाला वेदना होत असल्याचं बघून मित्र अश्वथामाने पांडवांचा नाश करण्याचा संकल्प केला. त्यांना मारण्यासाठी तो पांडवांच्या छावणीत पोहोचला. पण, अश्वथामाच्या हातून पांडवांच्या ऐवजी त्यांच्या झोपलेल्या मुलांचा अंत झाला.

Mahabharat : महाभारतातील तो योद्धा ज्याचा शापच ठरला त्याच्या जीवनातील मोठा वरदान

कुरुवंशाच्या नाशाची बातमी ऐकून दुर्योधनाचा अंत

ही बातमी सांगायला दुर्योधनाकडे गेला. पांडवांच्या सर्व मुलांच्या मृत्यूने संपूर्ण कुरुवंशाचा नाश झाला. जखमी झालेल्या दुर्योधनाने अश्वथाम्याची ही बातमी ऐकून आपला प्राण सोडला होता. कुळाचा नाश झाल्याचे कळताच दुर्योधनाने प्राण सोडले. तरी शेवटचा वंशज मात्र, जिवंत होता. अभिमन्यूची पत्नी उत्तराने परिक्षित नावाच्या मुलाला जन्म दिला होता. दुर्योधनाला पांडव पुत्रांना मारले म्हणून दुःख झाले. तर काही ग्रंथांमध्ये आनंद झाल्याचे मतप्रवाह आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाभारतात दुर्योधनाचा अंत कसा झाला?

    Ans: कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या शेवटी गदायुद्धात भीम आणि दुर्योधन यांच्यात भीषण लढत झाली. युद्धाच्या नियमांनुसार कंबरखाली वार करणे निषिद्ध होते, पण श्रीकृष्ण यांच्या सूचनेनुसार भीमाने दुर्योधनाच्या मांडीत गदा मारली आणि त्याचा पराभव करून त्याचा अंत केला.

  • Que: अश्वत्थामाने कोणती मोठी चूक केली होती?

    Ans: आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा याने रात्रीच्या वेळी पांडवांच्या छावणीवर हल्ला केला. त्यावेळी त्याने पांडव समजून द्रौपदीच्या पाच मुलांची हत्या केली. ही कृती युद्धनियमांच्या विरुद्ध असल्याने ती त्याची मोठी चूक मानली जाते.

  • Que: दुर्योधनाच्या मृत्यूनंतर काय घडले?

    Ans: दुर्योधनाच्या मृत्यूनंतर कौरव पक्ष पूर्णपणे पराभूत झाला. तरीही अश्वत्थामाने सूडाच्या भावनेने पांडवांच्या शिबिरावर हल्ला करून युद्धानंतरही हिंसाचार घडवून आणला.

Web Title: Mahabharat katha the end of duryodhana and the big mistake of ashwatthama are important events in the mahabharata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • mahabharat katha
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

Mahabharat Navratri Story: रावणसोबतच या पांडवानेही केली देवी दुर्गेची पूजा
1

Mahabharat Navratri Story: रावणसोबतच या पांडवानेही केली देवी दुर्गेची पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.