फोटो सौजन्य- pinterest
महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे रक्षण करण्यासाठी अनेक युक्त्या, मार्गदर्शन केले आणि योग्य वेळी हस्तक्षेप केला. अर्जुनाचे सारथ्य केले, भगवद्गीतेचा उपदेश दिला, द्रोणाचार्यांचा वध करण्याची योजना आखली, कर्णाचे रथ चाक चिखलात अडकले असताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला संधी साधून बाण सोडण्यास सांगितले. भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारावी अशी युक्ती श्रीकृष्णांनी सांगितली. श्रीकृष्णांनी स्वतः शस्त्र न उचलता बुद्धी, नीती, आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर पांडवांचे रक्षण करून त्यांना विजय मिळवून दिला. कारण अधर्माचा नाश करायचा होता. धर्माला विजय प्राप्त करून द्यायचा होता.
महाभारताच्या युद्धा पांडवांवर अनेक संकटे आली. असेच एक संकट आले ते म्हणजे पितामह भीष्म यांच्या प्रतिज्ञतेचे. त्यातून मार्ग काढणे पांडवांना अवघड होते पण पांडवांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत चातुर्याने एक योजना आखली. कौरवांच्या बाजूने सेनापती असलेले भीष्म पितामह हे अपराजित योद्धे होते. त्यांना पराभूत करणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत दुर्योधन वारंवार भीष्म पितामहांना टोचून बोलत असे. तुम्ही पांडवांवर प्रेम करता म्हणून पूर्ण ताकदीने लढत नाही, असे तो कटू शब्दांत म्हणत असे. या शब्दांनी दुःखी झालेल्या भीष्म पितामहांनी संतापाने जाहीर केले की उद्या ते पांडवांचा वध करतील. ही बातमी पांडवांच्या छावणीत पोहोचताच सर्वजण चिंतेत पडले. कारण भीष्म पितामहांच्या प्रतिज्ञेला कोणीही हलके घेऊ शकत नव्हते. ती प्रतिज्ञा सत्यात उतरवण्यासाठी भीष्म काही करतील हे पांडवांना व श्रीकृष्णाला चांगले माहीत होते.
द्रौपदीने शांतपणे सांगितले, “आपण श्रीकृष्णाला विचारूया. संकटातून मार्ग काढण्याची बुद्धी त्यांच्याकडेच आहे.” द्रौपदीने संपूर्ण घटना श्रीकृष्णांना सांगितली. श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, “भीष्मांची प्रतिज्ञा खोटी होणार नाही, पण त्यातून मार्ग नक्की निघू शकतो.” त्या रात्री श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्म पितामहांच्या तंबूकडे गेले. तंबूच्या बाहेर श्रीकृष्ण थांबले आणि द्रौपदीला म्हणाले, “तू आत जा आणि नमस्कार कर. तुझे बांगड्यांचे आवाज ऐकून भीष्म तुला स्त्री समजून आशीर्वाद देतील.”
द्रौपदी हळूच आत गेली. तिने नम्रपणे बांगड्या वाजवत भीष्म पितामहांना वंदन केले. झोपेतून जागे होत भीष्म पितामहांनी तिला स्त्री समजून लगेच आशीर्वाद दिला — “अखंड सौभाग्यवती भव!” मात्र पुढच्या क्षणी त्यांनी पाहिले तर ती द्रौपदी होती. ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, “द्रौपदी, ही युक्ती तुझी नाही. तुझ्यासोबत कोण आहे?” द्रौपदीने नम्रपणे सांगितले की बाहेर एक गडी उभा आहे.
भीष्म पितामह बाहेर आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला पाहिले. तेव्हा त्यांना संपूर्ण युक्ती समजली. त्यांनी हसतच मान्य केले की आता त्यांनी दिलेला आशीर्वाद खोटा ठरू शकत नाही.
द्रौपदीला “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद दिल्यानंतर पांडवांचा वध करणे शक्य नव्हते. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या बुद्धीमत्तेमुळे आणि द्रौपदीच्या धैर्यामुळे पांडवांचे रक्षण झाले. संकटाच्या काळात पांडवांचा सखा श्रीकृष्ण यांचे बुद्धी, धैर्य आणि योग्य मार्गदर्शन पांडवांना मिळाले नसते तर कितीही मोठे संकट होते. पण श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्यामुळे पांडव यातून वाचले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भीष्मा पितामहांनी संतापाच्या भरात पुढील दिवशी पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांच्या पराक्रमामुळे ही प्रतिज्ञा पूर्ण होण्याची भीती पांडवांना वाटत होती.
Ans: पांडव संकटात असताना कृष्णा यांनी बुद्धी आणि नीतीचा वापर करून एक युक्ती आखली. या योजनेत द्रौपदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
Ans: भीष्मा यांनी द्रौपदीला “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद दिला. या आशीर्वादामुळे पांडवांचा वध करणे त्यांच्यासाठी शक्य राहिले नाही.






