Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharata: अर्जुनाची प्रतिज्ञा आणि श्रीकृष्णांची युक्ती, जाणून घ्या जयद्रथ वधाची अद्भुत कथा

महाभारताच्या युद्ध जर पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण नसते. तर काय झाले असते. याचे उत्तर स्पष्टपणे महाभारताच्या प्रसंगातून दिसून येईल. जयद्रथ वधाचा प्रसंग हे सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 04, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महाभारतातील जयद्रथ वधाची कथा
  • अर्जुनाची जयद्रथ वधाची प्रतिज्ञा
  • महाभारतामधील अद्भुत कथा
 

महाभारत हा केवळ युद्ध नव्हते तर ते मानवी जीवनातील नैतिकता, कर्तव्य, निर्णयक्षमता आणि बुद्धिमत्तेचा महासंग्राम आहे. या महासंग्रामात श्रीकृष्ण यांची भूमिका केवळ एक सारथी किंवा मित्र म्हणून मर्यादित राहत नाही, तर ते एक दूरदृष्टी असलेले रणनीतीकार, तत्त्वज्ञ आणि धर्मसंस्थापक म्हणून उभे राहतात. जयद्रथ वधाचा प्रसंग हा या सर्व गुणांचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

कोण होता जयद्रथ

महाभारतातील जयद्रथ हा सिंधू देशाचा राजा आणि दुर्योधनाचा मेहुणा (दुःशलेचा पती) होता, जो कौरवांच्या बाजूने लढला. त्याने अभिमन्यूच्या वधात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र होता. वनवासात असताना जयद्रथाने द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पांडवांनी त्याला अपमानित करून सोडले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने तपश्चर्या करून महादेवाकडून “अर्जुनाशिवाय इतर चार पांडवांना एका दिवसासाठी रोखून धरण्याचे” वरदान मिळवले होते.

‘या’ साधूने 11 वेळा पाहिलंय रामायण, 16 वेळा महाभारत! ‘जीवन एक चक्र’ पुन्हा घडतं सगळं, पण प्रत्येक वेळी…

महाभारताच्या युद्धाच्या तेराव्या दिवशी वीर अभिमन्यू यांचा चक्रव्यूहमधून बाहेर न पडता आल्याने अन्यायकारक वीर मरण आल्यानंतर, पिता अर्जुन संतापाने पेटून उठले. ते प्रतिज्ञा करतात की 14व्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जयद्रथ याचा वध करणार अन्यथा स्वतः अग्निदहन करील. ही प्रतिज्ञा केवळ वैयक्तिक सूडाची नव्हती, तर धर्मासाठी लढणाऱ्या योद्ध्याच्या सन्मानाची होती. पण या प्रतिज्ञेने अर्जुन स्वतःच एका कठीण सापळ्यात अडकतो.

कौरवांच्या बाजूने जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी अभेद्य व्यूह रचला जातो. द्रोण, कर्ण, कृपाचार्य यांसारखे पराक्रमी योद्धे अर्जुनाचा मार्ग अडवतात. वेळ सरकत असतो आणि सूर्यास्त समीप येत असतो. या निर्णायक क्षणी युद्धाचे पारडे कौरवांच्या बाजूने झुकताना दिसते. याच ठिकाणी श्रीकृष्ण यांच्या रणनीतीची खरी कसोटी लागते. त्यांनी एक अशी युक्ती आखली जी केवळ युद्ध जिंकण्यासाठी नव्हे, तर अर्जुनाची प्रतिज्ञा आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी होती. त्यांनी आपल्या योगशक्तीने व सुदर्शन चक्राने सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण केला. ( कदाचित ते सूर्यग्रहणच निर्माण केले.) रणांगणात अंधार पसरल्याचा भास झाला आणि कौरवांना वाटले की अर्जुन अपयशी ठरला आहे.

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या

जयद्रथ निश्चिंत होऊन समोर येतो याच क्षणाची श्रीकृष्ण वाट पाहत होते. ते अर्जुनाला संकेत देतात आणि क्षणार्धात परिस्थिती पालटते. श्रीकृष्ण आपले सुदर्शन चक्र सूर्यापासून मागे घेतात आणि क्षणार्धात सूर्य पुन्हा प्रकट होतो आणि अर्जुन आपल्या अद्वितीय धनुर्विद्येने जयद्रथाचा वध करतो. ही केवळ युद्धातील विजयाची घटना नव्हती, तर ती योग्य वेळ साधून घेतलेल्या निर्णयाची आणि बुद्धीच्या विजयाची कहाणी होती.

या प्रसंगावर विचार करताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, धर्मरक्षणासाठी युक्तीचा वापर योग्य आहे का? काहींना श्रीकृष्णांची ही कृती छल वाटू शकते. परंतु महाभारताच्या व्यापक संदर्भात पाहिले तर कौरवांनी आधीच अनेक वेळा अधर्माचा अवलंब केला होता. अभिमन्यूचा अन्यायकारक वध हे त्याचे ठळक उदाहरण आहे. अशा परिस्थितीत, धर्माचे रक्षण करण्यासाठी युक्तीचा वापर हा अन्यायाविरुद्धचा आवश्यक प्रतिसाद ठरतो.

श्रीकृष्णांचा हा निर्णय आपल्याला एक गूढ पण वास्तववादी संदेश देतो, जीवनात केवळ सत्य आणि न्याय पुरेसे नसतात; त्यांना टिकवण्यासाठी बुद्धी, वेळेचे भान आणि योग्य रणनीती आवश्यक असते. केवळ शौर्यानेच विजय मिळत नाही, तर विचारपूर्वक घेतलेले निर्णयही तितकेच महत्त्वाचे असतात.

शेवटी, जयद्रथ वधाचा प्रसंग हा केवळ एका शत्रूचा अंत नसून, तो अधर्मावर धर्माच्या विजयाचा, अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा आणि गोंधळावर सुबुद्धीच्या विजयाचा प्रतीक आहे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयद्रथ कोण होता?

    Ans: जयद्रथ हा सिंधु देशाचा राजा आणि कौरवांचा जावई होता. तो दुर्योधनाचा मेव्हणा होता आणि महाभारतातील एक महत्त्वाचा योद्धा मानला जातो.

  • Que: अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा का केली?

    Ans: अभिमन्यूच्या मृत्यूसाठी जयद्रथ मुख्यतः जबाबदार होता. चक्रव्यूहात प्रवेश केल्यानंतर इतर पांडवांना अडवण्याचे काम जयद्रथाने केले, त्यामुळे अर्जुनाने त्याचा वध करण्याची शपथ घेतली.

  • Que: जयद्रथाचा वध कसा झाला?

    Ans: सूर्यास्त झाला असे समजून जयद्रथ निश्चिंत झाला आणि समोर आला. त्याच वेळी श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र हटवले आणि अर्जुनाने अचूक बाण मारून त्याचा वध केला.

Web Title: Mahabharata katha the amazing story of jayadrath vadh killing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • mahabharat katha
  • Mahabharata facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

‘या’ साधूने 11 वेळा पाहिलंय रामायण, 16 वेळा महाभारत! ‘जीवन एक चक्र’ पुन्हा घडतं सगळं, पण प्रत्येक वेळी…
1

‘या’ साधूने 11 वेळा पाहिलंय रामायण, 16 वेळा महाभारत! ‘जीवन एक चक्र’ पुन्हा घडतं सगळं, पण प्रत्येक वेळी…

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या
2

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.