Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharata: महाभारत युद्ध टळू शकले असते? दुर्योधनाच्या हट्टामुळे कौरवांचा पराभव

भगवान श्रीकृष्णांनी महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. दुर्योधनाकडे भगवंत गेले. पण श्रीकृष्णाचा प्रस्ताव दुर्योधनाने अंहकाराने नाकारला. त्यामुळे पांडवांच्या ऐवजी कौरवाचाच पराभव झाला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 06, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महाभारत युद्ध टळू शकले असते
  • दुर्योधनाच्या हट्टामुळे कौरवांचा पराभव
  • दुर्योधनाने श्रीकृष्णांना कैद करण्याचा प्रसंग
 

 

महाभारत हा केवळ शस्त्रांचा संघर्ष नव्हता, तर तो विचारांचा, मूल्यांचा आणि धर्म-अधर्माच्या सीमारेषांचा संघर्ष होता. या महान संघर्षात श्रीकृष्ण यांनी घेतलेली भूमिका अत्यंत सूक्ष्म आणि दूरदर्शी होती. युद्ध टाळता येईल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत बनून हस्तिनापुरात जाऊन दुर्योधन याच्याशी संवाद साधला हा प्रसंग आजही नेतृत्व, राजनय आणि नैतिकतेचा आदर्श मानला जातो. त्यांचा शिष्टाचार जर सफल झाला असता तर युद्ध कदाचित टाळले गेले असते.

पांडवांना पाच गावे देण्याचा प्रस्ताव

पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष केवळ सत्तेसाठी नव्हता; तो न्याय आणि अन्याय यांच्यातील होता. जुगाराच्या खेळात पांडवांना फसवून त्यांचे राज्य हिरावून घेतले गेले आणि त्यांना वनवास भोगावा लागला. वनवास आणि अज्ञातवास पूर्ण केल्यानंतरही पांडवांना त्यांचे हक्काचे राज्य परत देण्यास कौरवांनी नकार दिला. या परिस्थितीत युद्ध अटळ वाटत होते.

Mahabharata: अर्जुनाची प्रतिज्ञा आणि श्रीकृष्णांची युक्ती, जाणून घ्या जयद्रथ वधाची अद्भुत कथा

परंतु युद्ध म्हणजे केवळ विजय-पराजय नव्हे, तर असंख्य जीवांचा बळी, समाजाचे विघटन आणि संस्कृतीचे नुकसान हे श्रीकृष्णांना पूर्णपणे ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून शांतिदूताची भूमिका स्वीकारली. ते हस्तिनापुरात गेले आणि दुर्योधनासमोर एक न्याय्य प्रस्ताव ठेवला पांडवांना त्यांचे संपूर्ण राज्य नको, फक्त पाच गावे द्या. हा प्रस्ताव अत्यंत मवाळ आणि तडजोडीचा होता. खरंतर एकादृष्टीने हा प्रस्ताव सुयोग्य होता.

दुर्योधनाचा अहंकार

पण दुर्योधनाचा अहंकार इतका प्रबळ होता की त्याने हा प्रस्ताव फेटाळला. त्याची अहंकार, हट्टीपणा आणि अधर्मची वाटचाल होती. संवाद, तडजोड आणि शांततेचा मार्ग त्याने पूर्णपणे नाकारला.

या प्रसंगात श्रीकृष्णांची भूमिका केवळ संदेशवाहकाची नव्हती. त्यांनी दुर्योधनाला धर्माचे, न्यायाचे आणि परिणामांचे भान देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला युद्धाच्या भयानक परिणामांची जाणीव करून दिली. पण जेव्हा समोरचा पक्ष अहंकाराने आंधळा होतो, तेव्हा सत्याचे शब्दही निष्फळ ठरतात हीच या प्रसंगाची शोकांतिका आहे.

‘या’ साधूने 11 वेळा पाहिलंय रामायण, 16 वेळा महाभारत! ‘जीवन एक चक्र’ पुन्हा घडतं सगळं, पण प्रत्येक वेळी…

दुर्योधनाने श्रीकृष्णांना कैद करण्याचा प्रसंग

इतकेच नव्हे, दुर्योधनाने श्रीकृष्णांना कैद करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी श्रीकृष्णांनी आपले विराट रूप प्रकट करून दाखवले की ते केवळ मानव नाहीत, तर एक दैवी शक्ती आहेत. हा प्रसंग दुर्योधनासाठी एक इशारा होता, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

या संपूर्ण घटनाक्रमातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो शांतता ही नेहमीच पहिली निवड असावी. युद्ध हा शेवटचा पर्याय असावा. श्रीकृष्णांनी हे तत्त्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांनी युद्ध टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण जेव्हा ते अपयशी ठरले, तेव्हा धर्माच्या बाजूने उभे राहून युद्धात मार्गदर्शन केले.

शेवटी, हस्तिनापुरातील श्रीकृष्णांचे शांतिदूतत्व हे केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नसून, ते एक कालातीत धडा आहे. ते आपल्याला शिकवते की, “संवादाने शांतता साधता येते; पण अहंकाराने युद्ध अनिवार्य होते.” आणि म्हणूनच, श्रीकृष्णांचे हे प्रयत्न मानवतेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या शांतता प्रयत्नांपैकी एक मानले जातात. श्रीकृष्णाचा प्रस्ताव दुर्योधनाने अंहकाराने नाकारला त्यामुळे पांडवांच्या ऐवजी कौरवाचाच पराभव झाला.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाभारत युद्ध टळू शकले असते का?

    Ans: हो, जर दुर्योधन यांनी श्रीकृष्ण यांचा शांततेचा प्रस्ताव मान्य केला असता, तर युद्ध टळू शकले असते.

  • Que: दुर्योधनाने हा प्रस्ताव का नाकारला?

    Ans: अहंकार, हट्टीपणा आणि सत्तेची लालसा यामुळे दुर्योधनाने तडजोड करण्यास नकार दिला.

  • Que: या प्रसंगातून काय शिकायला मिळते?

    Ans: संवाद, संयम आणि तडजोड यांचा मार्ग निवडल्यास संघर्ष टाळता येतो

Web Title: Mahabharata war could have been avoided duryodhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • mahabharat katha
  • Mahabharata facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

Mahabharata: अर्जुनाची प्रतिज्ञा आणि श्रीकृष्णांची युक्ती, जाणून घ्या जयद्रथ वधाची अद्भुत कथा
1

Mahabharata: अर्जुनाची प्रतिज्ञा आणि श्रीकृष्णांची युक्ती, जाणून घ्या जयद्रथ वधाची अद्भुत कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.