Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते? उडवण्यामागे काय आहे कारण शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण

मकरसंक्रांतीच्या सणाला तिळगूळ वाटण्यासोबतच पतंग उडवण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्यास उत्सुक असतात. मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते, जाणून घ्या कारणे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 14, 2026 | 08:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मकरसंक्रांतीचे काय आहे महत्त्व
  • मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते
  • पतंग उडवण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारणे
 

 

मकरसंक्रांतीचा सण भारताच्या जवळपास सर्वच भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 14 जानेवारी रोजी हा सण भारतात साजरा केला जाणार आहे. या शुभदिवसाच्या शुभ मुहूर्तावर सूर्यनारायणाची उपासना करणे आणि गंगेत स्नान करणे, एकमेकांचा स्नेह वाढावा म्हणून तीळगूळ दिले जात हेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण त्याचबरोबर मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे कोणती परंपरा आहे, यामागे कोणते धार्मिक कारण आहे, शास्त्र आहे का? कोणत्या राज्यात सर्वाधिक ही परंपरा जपली जाते, जाणून घेऊया

मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा भगवान रामाशी संबंधित आहे. असे मानले जाते की भगवान रामाने मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाशात पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की, जेव्हा भगवान रामाने पतंग उडवला तेव्हा तो पतंग इंद्रलोकात गेला. यानंतर मकरसंक्रांतीच्या दिवशी जवळपास सर्वत्र पतंग उडवण्याची प्रथा सुरू झाली. पतंगबाजीलाही नवीन पिकाच्या अनुषंगाने पाहिले जाते.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे काय आहे सामाजिक महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवण्यासाठी एकत्र येतात. ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. पतंग उडवणे हा मुलांसाठी एक मजेदार मनोरंजन आहे, जो त्यांच्या बालपणीच्या आठवणी निर्माण करतो आणि प्रौढांसाठी बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो.

पतंग उडविणे आरोग्यदायी

पतंग उडविणे किती आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने सूर्यापासून शक्तीदेखील मिळते. कारण हिवाळ्यात सूर्यप्रकाशात बसणे किंवा खेळणे योग्य मानले जाते. पतंग उडवताना मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांचा जसे हातांचा वापर जास्त होतो, त्यामुळे थंडीत आखडलेले स्नायू ही मोकळे होतात. त्यामुळे एकप्रकारे व्यायामही होतं असतं. पतंग उडवणे हे बहुतांश तरुण करतात. ज्यामुळे त्वचा आणि इतर आजार दूर होतात. पतंग उडवताना दिवसभर सूर्यकिरणांच्या संपर्कात राहिल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ

आनंद आणि उत्साह

मकरसंक्रांत हा सण आनंद, उत्साह आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्सव आहे. पतंगबाजीमुळे वातावरण आनंदी होते. हा एक खेळाचाही प्रकार आहे. त्यामुळे लहान मुले, तरूण मुले यात पतंग काटा, काटीचेही खेळ खेळतात. त्यामुळे काही ठिकाणी आता याला स्पर्धात्मक स्वरूप आले आहे. गुजरातमध्ये आता पतंग उडवण्याच्या स्पर्धाही होत असतात. मकरसंक्रांतीच्या या काळात हवामान पतंग उडवण्यासाठी अनुकूल असते, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा का आहे?

    Ans: मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सूर्यदेवाचे स्वागत आणि उत्सव साजरा करण्यासाठी पतंग उडवण्याची परंपरा आहे.

  • Que: पतंग उडवण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे?

    Ans: हिवाळ्यात सकाळी सूर्यप्रकाशात राहणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पतंग उडवताना सूर्यप्रकाश शरीरावर पडतो, व्हिटॅमिन-D मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

  • Que: मकरसंक्रांतीला पतंग उडवणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पतंग उडवणे सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि उत्साह वाढवणारे मानले जाते

Web Title: Makar sankranti 2026 why are kites flown on makar sankranti the scientific and cultural reasons explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
1

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
2

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
3

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश
4

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.