फोटो सौजन्य- pinterest
नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा सण यावेळी विशेष असणार आहे. मकर संक्रांतीचा सण धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते.
मकर संक्रांतीचा सण नवीन ऊर्जा, उज्ज्वल भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तीळ, काळे तीळ, उडीद डाळ, लोखंड, उबदार वस्त्र, तांबे आणि गूळ यांचे दान केल्यास पुण्यप्राप्ती होते. तसेच सूर्याला अर्घ्य देणे आणि शनिवारी तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रात यंदा १४ की १५ जानेवारीला आहे? ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा मकर संक्रातीला २३ वर्षांनंतर सूर्य-शनि महासंयोग बनतोय. वैदिक दिनदर्शिकनुसार, यंदा मकर संक्राती सण १४ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
ज्योतिषींच्या मते, यंदा सूर्य आणि शनिचा दुर्मिळ महासंयोग होत आहे. ज्योतिषांच्या मते, २३ वर्षांनंतर येणारा हा एक विशेष संयोग आहे, जो काही राशींनाच सौभाग्य आणि यश देईल. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांची राशी या तिन्ही राशींमध्ये येत नाही त्यांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी.
ज्योतिषांच्या मते, १४ जानेवारी रोजी तयार होणारा हा संयोग दर २३ वर्षांनी एकदाच होतो. या दिवशी केलेल्या धार्मिक विधी आणि उपासनेचे परिणाम इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मानले जातात. हा महासंयोग ज्याच्या राशी सध्या अनुकूल ग्रह स्थितीत आहेत त्यांच्यावर विशेषतः परिणाम करेल. या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जीवनात स्थैर्य, शांती आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते.
या दिवशी पूजा आणि विधी करताना नियमांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी, या महासंधीचा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव पडणार नाही तर सामाजिक आणि मानसिक पातळीवर सकारात्मक ऊर्जादेखील मिळेल. कुटुंब आणि समाजात सुसंवाद वाढविण्यासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि एखाद्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळविण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते आणि तो अत्यंत शुभ मानला जातो.
Ans: जेव्हा सूर्य आणि शनी एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याला सूर्य–शनी महासंयोग म्हणतात. हा योग कर्म, न्याय आणि आत्मशुद्धीशी संबंधित मानला जातो.
Ans: सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणे, शनिदेवांसाठी तेलाचा दिवा लावणे, तीळ व उडीद डाळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.






