Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित, अशी करा देवीची पूजा आणि महत्त्व

Navratri 2026: गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस. हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. या देवीला मातृत्व, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या पूजा विधी, मंत्र आणि पिवळ्या रंगाचे महत्त्व

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित
  • स्कंदमाता देवीची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व
  • पिवळ्या रंगांचे काय आहे महत्त्व
 

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. नवदुर्गांमध्ये हे पाचवे रुप आह. स्कंदमाता या भगवान कार्तिकेय अर्थात स्कंद यांच्या माता आहे. त्यांच्या मांडीवर बाल स्कंद विराजमान असल्याचे स्वरुप देवीच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हे मातृत्व, प्रेम वात्सल्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं.

पिवळ्या रंगांचे महत्त्व

यंदा पाचव्या दिवशी पिवळा रंग आहे. पिवळा रंग हा आनंद, सकारात्मकता, ज्ञान, समृद्धी आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करून देवीची पूजा करावी. पूजेमध्ये पिवळी फुल किंवा पूजेसंबंधित पिवळ्या रंगांच्या संबंधित वस्तूंचा वापर करावा.

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

स्कंद मातेला केळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. याशिवाय खीर, पंचामृत, हळद, गोड पदार्थ आणि परंपरेनुसार सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवतात. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. देवीसमोर दिवा लावून पिवळी फुल, अक्षता, नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर स्कंदमातेची आरती आणि नामस्मरण करावं. या दिवशी ओम देवी स्कंदमातेय नमः या मंत्रांचा जप करावा.

मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करणे

देवीच्या पूजेसोबत आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. असं म्हणतात की, स्कंदमातेची भक्तीभावाने पूजा केल्यामुळे शांती, सुख, सकारात्मकता आणि मातृकृपा प्राप्त होते. नवरात्रीचा पाचवा दिवस त्यामुळे विशेषतः मातृत्व आणि प्रेमशक्तीचा स्मरण करण्याचा दिवस मानला जातो.

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

कोण आहे देवी स्कंदमाता?

नवदुर्गांमध्ये देवी स्कंदमाता हे पाचवे रूप आहे. भगवान कार्तिकेय यांना स्कंद या नावानेही ओळखले जाते. स्कंदमाता ही त्यांची माता असल्यामुळे देवीला हे नाव प्राप्त झाले, अशी धार्मिक मान्यता आहे. देवीच्या मूर्तीमध्ये बाल स्कंद तिच्या मांडीवर विराजमान असल्याचे चित्रण पाहायला मिळते. देवी कमळावर विराजमान असल्यामुळे तिला पद्मासना असेही म्हटले जाते.

स्कंदमातेचे स्वरूप मातेच्या प्रेमाची आणि आपल्या अपत्याचे रक्षण करण्याच्या शक्तीची आठवण करून देते. त्यामुळे या दिवशी विशेषतः मुलांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने मनाला शांती आणि सकारात्मकतेची प्रेरणा मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवरात्रीचा पाचवा दिवस कोणत्या देवीला समर्पित असतो?

    Ans: नवरात्रीचा पाचवा दिवस देवी दुर्गेच्या पाचव्या स्वरूपाला, म्हणजेच स्कंदमातेला समर्पित असतो. या दिवशी देवीची भक्तिभावाने पूजा केली जाते.

  • Que: स्कंदमाता देवी कोण आहे?

    Ans: स्कंदमाता ही भगवान कार्तिकेय अर्थात स्कंद यांची माता आहे. देवीच्या मांडीवर बालस्वरूपातील स्कंद विराजमान असल्याचे चित्रण केले जाते.

  • Que: स्कंदमाता देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?

    Ans: स्कंदमाता देवीला केळी, खीर, दूध आणि सात्त्विक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, नैवेद्याच्या परंपरा कुटुंबानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

Web Title: Navratri 2026 worship goddess skandamata on the fifth day of navratri pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • Navratri festival

संबंधित बातम्या

Bhondla 2026: ऐलमा पैलमा गणेश देवा… भोंडला म्हणजे काय? जाणून घ्या परंपरा, महत्त्व आणि खेळण्याची पद्धत
1

Bhondla 2026: ऐलमा पैलमा गणेश देवा… भोंडला म्हणजे काय? जाणून घ्या परंपरा, महत्त्व आणि खेळण्याची पद्धत

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास
2

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी
3

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या
4

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.