Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: लाथ मारेन तिथे पाणी काढेन; ‘या’ जन्मतारखेला जन्मलेली मुलं कमावतात गडगंज पैसा

Numerology : अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाचा एक स्वामी असतो. या स्वामीग्रहाचा प्रभाव त्या त्या मुलांकाच्या व्यक्तींवर होत असतो. काही मूलांक असे मानले जातात की, ज्यांच्यात पैसा कमावण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि व्यवसायिक बुद्धी अधिक असते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 06:54 PM
numerology news

numerology news

Follow Us
Follow Us:
  • लाथ मारेन तिथे पाणी काढेन; ‘
  • या’ जन्मतारखेला जन्मलेली मुलं कमावतात गडगंज पैसा
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार काही मूलांक (Birth Number) असे मानले जातात, ज्यांच्यात पैसा कमावण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि व्यवसायिक बुद्धी अधिक असते. जन्मतारखेच्या बेरीजेतून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, 25 तारखेला जन्म असेल तर 2+5 = 7, म्हणजे मूलांक 7. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या मुलांकाच्या व्यक्ती सर्वात जास्त श्रीमंत होतात.

अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांकाचा एक स्वामी असतो. या स्वामीग्रहाचा प्रभाव त्या त्या मुलांकाच्या व्यक्तींवर होत असतो.

मूलांक 1

सूर्याचा प्रभाव असलेला हा मूलांक नेतृत्व, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्नं पाहण्याची क्षमता देतो. हे लोक स्वतःचा व्यवसाय, प्रशासन किंवा उच्च पदांवर यशस्वी होतात. पैशाबाबत धाडसी निर्णय घेतात.

Zodiac Horoscope : गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत, गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ

मूलांक 5

बुध ग्रहाचा प्रभाव असल्याने हे लोक अत्यंत हुशार, संवादकुशल आणि व्यापारात पारंगत असतात. मार्केटिंग, मीडिया, शेअर मार्केट, व्यवसाय आणि कमिशन क्षेत्रात मोठी कमाई करू शकतात.

मूलांक 8

शनीचा प्रभाव असलेले लोक मेहनती आणि संयमी असतात. सुरुवातीला संघर्ष असला तरी पुढे मोठा पैसा, संपत्ती आणि स्थिरता मिळवतात. उद्योग, रिअल इस्टेट आणि व्यवस्थापन क्षेत्रात यश मिळते.

मूलांक 9

मंगळाचा प्रभाव असल्याने हे लोक धाडसी, ऊर्जावान आणि जोखीम घेणारे असतात. राजकारण, संरक्षण, क्रीडा किंवा मोठ्या व्यवसायात आर्थिक प्रगती करतात.

मूलांक 6

शुक्र ग्रहामुळे ऐश्वर्य, सुखसुविधा आणि आकर्षण मिळते. कला, फॅशन, मनोरंजन, लक्झरी व्यवसाय आणि सौंदर्य क्षेत्रातून भरपूर पैसा कमावण्याची क्षमता असते.

तथापि, केवळ मूलांकामुळेच श्रीमंती मिळते असे नाही. मेहनत, योग्य निर्णय, शिक्षण आणि वेळेचे महत्त्व हेही तितकेच आवश्यक असते. Numerology ही श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासावर आधारित पद्धत आहे. अंकशास्त्रानुसार केवळ मूलांकच नाही, तर व्यक्तीची विचारसरणी, स्वभाव, निर्णयक्षमता आणि नशिबाचे चक्रही आर्थिक यशावर प्रभाव टाकतात. काही लोकांना पैसा पटकन मिळतो, तर काहींना उशिरा पण भरपूर यश मिळते. प्रत्येक मूलांकाची पैसे कमवण्याची पद्धत वेगळी असते.

कोणते मूलांक व्यवसायात यशस्वी होतात?

मूलांक 1, 5 आणि 8 असलेले लोक व्यवसाय, गुंतवणूक आणि नेतृत्व क्षेत्रात अधिक यशस्वी मानले जातात.
मूलांक 3 असलेले लोक व्यवस्थापन, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रातून पैसा कमावतात.
मूलांक 7 असलेले लोक संशोधन, अध्यात्म, तंत्रज्ञान आणि परदेशाशी संबंधित कामातून लाभ मिळवतात.

कोणत्या मूलांकांना अचानक धनलाभ होतो?

अंकशास्त्रात 5, 8 आणि 9 या मूलांकांना अचानक धनलाभाचे योग अधिक मानले जातात. शेअर मार्केट, जमीन, वारसा किंवा मोठ्या संधीमधून लाभ मिळू शकतो.

Devghar Vastu Tips : देवघरात एकाच देवतेचे दोन फोटो असणं शुभ की अशुभ, काय सांगतं वास्तुशास्त्र ?

पैसा टिकवण्यात कोण पुढे?

मूलांक 4 आणि 8 लोक पैशाचे उत्तम नियोजन करतात.
मूलांक 5 लोक पैसा पटकन कमावतात, पण खर्चही मोठ्या प्रमाणात करतात.
मूलांक 6 लोक ऐश्वर्यावर अधिक खर्च करतात.
कोणते दिवस शुभ मानले जातात?
मूलांक 1 – रविवार, सोमवार
मूलांक 5 – बुधवार
मूलांक 6 – शुक्रवार
मूलांक 8 – शनिवार
मूलांक 9 – मंगळवार

पैसा आकर्षित करण्यासाठी अंकशास्त्रातील उपाय कोणते ?

आपल्या मूलांकानुसार शुभ रंग वापरणे
शुभ अंकांचा मोबाइल नंबर, वाहन नंबर किंवा व्यवसायात वापर
नियमित दानधर्म आणि सकारात्मक विचार
घर किंवा ऑफिसमध्ये स्वच्छता आणि सुव्यवस्था राखणे

व्यक्तीचं भविष्य हे केवळ अंकशास्त्र किंवा कुंडलीवरच नाही तर त्याच्य़ा कर्मावर देखील अवलंबून असतं.

 

Web Title: Numerology mulank born on 15689 earn a lot of money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • mulank
  • numerology
  • religion news

संबंधित बातम्या

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?
1

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
2

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका;  नाहीतर वाढू शकतात अडचणी
3

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका; नाहीतर वाढू शकतात अडचणी

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
4

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.