
Sarva Pitru Amavasya 2026 : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी लोखंड किंवा लोखंडापासून बनलेली कोणतीही गोष्ट घरात आणू नये. असं म्हणतात की अमावस्येला लोखंड आणलं तर शनि दोष लागतो. घरात पैशाची चणचण भासते तसेच धनहानी होते. त्यामुळे या दिवशी चुकूनही लोखंडी भांडी, लोखंडी सामान खरेदी करू नका. जर तुम्हाला काही घ्यायचंच असेल तर ते एक दिवस आधी किंवा नंतर घ्या.
अमावस्येच्या दिवशी मोहरीचं तेल घरात आणणं अशुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार मोहरीच्या तेलाचा संबंध शनी देवाशी होतो. या दिवशी तेल आणल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. वाईट परिणाम भोगावे लागतात. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या दिवशी किराणा भरताना मोहरीचे तेल लिस्ट मधून काढून टाका.
Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ बनवणे टाळा, जाणून घ्या कारण
या दिवशी घरात धारदार वस्तू आणू नयेत असं सांगितलं जातं. सुई, कात्री, चाकू, खिळे, हत्यारं या वस्तू खरेदी करणं टाळावं. मान्यतेनुसार अशा वस्तू आणल्याने घरातील लोकांमध्ये भांडणं वाढतात. वाद-विवाद होतात. घरातील शांतता निघून जाते. तसेच नकली किंवा प्लास्टिकच्या वस्तू, खोटे दागिने पण या दिवशी घेऊ नयेत. त्याने सुद्धा अशुभ फळ मिळते.
पितृपक्ष हा मौज-मजा करण्याचा काळ नसून या दिवसांमध्ये पितरांना आठवण करण्याचा आणि त्यांना प्रसन्न करण्याचा आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला स्वतःसाठी नवीन कपडे, बूट, चप्पल खरेदी करू नये. असं केल्याने पितर नाराज होतात असं म्हणतात. जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो. नवीन वस्त्र घ्यायचे असतील तर नवरात्रीत घ्या, पण अमावस्येला नको.
अमावस्येला या वस्तू टाळण्याबरोबरच काही चांगल्या गोष्टी कराव्यात. या दिवशी सकाळी लवकर उठून पितरांसाठी तर्पण करावं. ब्राह्मणाला भोजन द्यावं, दान करावं. घरात दक्षिण दिशेला दिवा लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्यांचा आशीर्वाद कायम राहतो.थोडक्यात सांगायचं तर 10 ऑक्टोबरला जरा जपून राहा. उगाच शॉपिंगच्या नादात या गोष्टी घरात आणू नका. नाहीतर छोट्याशा चुकीमुळे मोठ्या अडचणी येऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)