फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत विशेष मानले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते. या अमावस्येच्या आई आपल्या मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी पूजा देखील केली जाते. यावेळी अमावस्या दोन दिवस आहे. पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीची सुरुवात १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:३३ वाजता होणार आहे आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८:५६ वाजता अमावस्या संपणार आहे. यावेळी पिठोरी अमावस्या १० सप्टेंबर रोजी आहे. अशावेळी या दिवशी आपल्या राशीनुसार काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे ग्रह दोषही शांत होतात, अशी मान्यता आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येला लाल मसूर किंवा गूळ दान करणे शुभ मानले जाते आणि यामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
पिठोरी अमावस्येला वृषभ राशीच्या व्यक्तींनी साखरेचे दान करावे, कारण त्यामुळे त्यांच्या सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होते असा विश्वास आहे.
मिथुन राशींच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी हिरव्या भाज्या किंवा हिरवे कपडे दान करणे शुभ मानले जाते.
कर्क राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी पैसे दान करणे फायदेशीर ठरेल. यामुळे चांगले भाग्य लाभू शकते.
सिंह राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी मिठाई दान करू शकतात, ज्यामुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असते.
कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवे मूग दान करणे शुभ असते. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मकता वाढू शकते.
तूळ राशींच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी तांदळाचे दान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार, तांदळाचे दान केल्याने शुभ परिणाम मिळतात.
वृश्चिक राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात.
धनु राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी चणा डाळीचे दान करू शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते.
कुंभ राशीचे लोक पिठोरी अमावस्येच्या दिवशी पैसे किंवा कपडे दान करू शकतात.
मीन राशीचे लोक हळद किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईंचे दान करू शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






