Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramanujacharya Jayanti: जातिभेदाविरुद्ध उभा राहिलेला संत; रामानुजाचार्यांची प्रेरणादायी कथा

आज रामानुजाचार्य यांचे कार्य हे केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित नसून, समाजातील समतेच्या विचाराशी जोडली गेले आहे. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देऊन सामाजिक समरसतेचे ते अग्रदूत झाले. आज त्यांची जयंती आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 22, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामानुजाचार्यांची प्रेरणादायी कथा
  • जातिभेदाविरुद्ध उभा राहिलेला संत
  • रामानुजाचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला “विशिष्टाद्वैत” या संकल्पनेची देणगी
 

 

 

भारतीय अध्यात्मपरंपरेत काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांनी केवळ धर्माची व्याख्या बदलली नाही, तर समाजाच्या विचारसरणीलाही नवे वळण दिले. अशा तेजस्वी संतांमध्ये रामानुजाचार्य (Ramanujacharya) यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या जीवनकार्याचा विचार केला, तर ते केवळ एक तत्त्वज्ञ नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते.

विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाची देणगी

११व्या शतकात जन्मलेल्या रामानुजाचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला “विशिष्टाद्वैत” या संकल्पनेची देणगी दिली. विशिष्टाद्वैत ही त्यांची प्रमुख विचारधारा होती, ज्यामध्ये त्यांनी अद्वैत आणि द्वैत यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, परमेश्वर, जीव आणि प्रकृती यांच्यातील नाते हे वेगळे असूनही एकमेकांशी निगडीत आहे. ही भूमिका केवळ तत्त्वज्ञानापुरती मर्यादित न राहता, ती समाजातील समतेच्या विचाराशी जोडली गेली.

Mohini Ekadashi 2026: 27 की 28 एप्रिल कधी आहे मोहिनी एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

ॐ नमो नारायणाय” मंत्र सर्वांसाठी उपलब्ध केला

रामानुजाचार्यांच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी धर्माला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. त्या काळात वेदाधिकार केवळ उच्चवर्णीयांपुरता मर्यादित होता. मात्र, रामानुजाचार्यांनी या परंपरेला छेद देत सर्व जातीधर्मातील लोकांना भक्तीचा आणि मोक्षाचा अधिकार दिला. त्यांनी “ॐ नमो नारायणाय” हा मंत्र सर्वांसाठी खुला केला. हा निर्णय त्या काळात क्रांतिकारी ठरला. खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे पहिले पाऊल होते.

भगवद्गीता व उपनिषदांवर सोप्या भाषेत भाष्य

त्यांच्या विचारांचा प्रभाव श्रीमद्भगवद्गीता आणि उपनिषदे यावरील त्यांच्या भाष्यांतून स्पष्ट दिसून येतो. त्यांनी या ग्रंथांचे सोपे, सुसंगत आणि सर्वसमावेशक अर्थ लावले, ज्यामुळे सामान्य माणसालाही अध्यात्म समजणे शक्य झाले. त्यांच्या लेखनातून भक्तीमार्गाला नवे बळ मिळाले.

Skanda Sashti 2026: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय

मंदिरांमध्ये सर्व समाजघटकांना प्रवेश मिळवून दिला

समाजसुधारणेच्या क्षेत्रातही रामानुजाचार्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी मंदिरांमध्ये सर्व समाजघटकांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न केले. श्रीरंग मंदिरांमध्ये त्यांनी समानतेचा विचार रुजवला. मेलकोटे (कर्नाटक) येथील तिरुनायराणपूरम (श्री चेलुवनारायण स्वामी) मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातील लोकांना प्रवेश मिळवून दिला होता. त्यांच्या कार्यामुळे धर्म हा केवळ विधीपुरता न राहता, तो समाजकल्याणाशी निगडीत झाला.

आजच्या काळात रामानुजाचार्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात. जातीभेद, विषमता आणि धार्मिक संकुचितता यांसारख्या समस्या अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. अशा वेळी त्यांच्या समतेच्या आणि भक्तीच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेणे अत्यावश्यक आहे.

रामानुजाचार्य हे केवळ इतिहासातील एक अध्याय नाहीत, तर ते आजही जिवंत असलेले विचार आहेत. समतेचे, सहिष्णुतेचे आणि मानवतेचे. त्यांच्या जीवनकार्याकडे पाहताना, आपण केवळ त्यांचे स्मरण न करता, त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

हैदराबादजवळील मुचिंतल येथे स्थित संत रामानुजाचार्य यांचा २१६ फूट उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (Statue of Equality) म्हणून ओळखला जातो. ११ व्या शतकातील समाजसुधारक रामानुजाचार्य यांच्या १,००० व्या जयंतीनिमित्त उभारलेला हा पुतळा पंचलोहा (पाच धातू) पासून बनलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच आसनस्थ धातूचा पुतळा आहे

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामानुजाचार्य कोण होते

    Ans: रामानुजाचार्य हे ११व्या शतकातील महान संत, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मात समता आणि भक्तीचा संदेश दिला.

  • Que: विशिष्टाद्वैत म्हणजे काय

    Ans: विशिष्टाद्वैत हे रामानुजाचार्यांचे तत्त्वज्ञान आहे, ज्यामध्ये परमेश्वर, जीव आणि प्रकृती यांचे वेगळेपण असूनही एकमेकांशी संबंध असल्याचे सांगितले आहे.

  • Que: “ॐ नमो नारायणाय” मंत्राचे महत्त्व काय?

    Ans: हा मंत्र त्यांनी सर्वांसाठी खुला केला, ज्यामुळे प्रत्येकाला ईश्वराशी थेट नाते जोडण्याची संधी मिळाली.

Web Title: Ramanujacharya jayanti the saint who stood against caste discrimination an inspiring story of ramanujacharya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता
1

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
2

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
3

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
4

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.