Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

शिर्डीचे साईबाबा हे केवळ संत नव्हते, तर संकटसमयी लोकांना धीर आणि आशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कारिक आणि प्रेरणादायी घटनांपैकी कॉलऱ्याच्या साथीच्या काळात गव्हाचे पीठ गावाच्या सीमेवर पसरवण्याची कथा विशेष प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया संपूर्ण कथा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 02, 2026 | 12:38 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय काय आहे कथा
  • कॉलराची साथ कशी नाहिशी झाली
  • श्री साई सच्चरित्रमध्ये साईबाबांच्या गव्हांच्या पिठाचा उपायांचा उल्लेख आढळतो
 

 

 

शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही भक्तांना श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देतात. त्यापैकी गव्हाचे पीठ दळून कॉलऱ्याच्या साथीपासून गावाचे संरक्षण केल्याची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. या प्रसंगाचा उल्लेख ‘श्री साई सच्चरित्र’ या ग्रंथात आढळतो. साईबाबा आणि त्यांचे भक्त अनेकदा ही कथा सांगतात ती म्हणजे 1910 साली बाबांनी कॉलराची साथ कशी नाहिशी केली आणि चमत्कार घडविला. ही नक्की कथा काय आहे ते जाणून घेऊया

साईबाबांनी एके दिवशी स्वतः गिरणीत गहू दळण्यास सुरुवात केली

एकेदिवशी सकाळी साईबाबांचे भक्त त्यांच्या घरी पोहोचले. त्यांना साईबाबांनी घेतलेले चणे आणि गहू पाहून आश्चर्य वाटलं त्यांनी एका टोपलीत थोडेसे गहू घेतले आणि मग आपल्या कपनीची माई वर करून गिरणीचं मुठा पकडला. मुठभर गहू गिरणीच्या वरच्या छिद्रात टाकत ते फिरवू लागले. साईबाबा गहू दळत होते.

Saibaba story: शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले, काय आहे कथा जाणून घ्या

चार महिलांनी बाबांची मदत करत गहू दळून पीठ तयार केले

भक्तांना आता धक्काच बसला कारण साई नियमित भिक्षा मागून जगत होते लवकरच गावकऱ्यांचा जमाव जमला ज्यामध्ये चार स्त्रिया होत्या. त्यांनी अखेरीस धाडस करून बाबांचा हात धरला आणि बाबांसाठी देवाची स्तुती करणारे गीत गाऊ लागल्या. गावकऱ्याचं प्रेम आणि भक्ती पाहून बाबा किंचितचे हसले मग त्या चार स्त्रियांनी गहू दळायले घेतले. गहू दळत असताना त्या स्त्रियांनी विचार केला बाबांना घर नाही, मालमत्ता नाही, मुलं नाहीत काळजी घेणारंही कोणी नाही ते भिक्षा मागून जगतायत. त्यांना भाकरी किंवा पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची गरजही नाही आहे मग ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पिठाचं काय करणार आहेत. कदाचित बाबा खूप द्याळू असतील म्हणून ते एवढं पीठ आपल्या सर्वांमध्ये वाटून घेतील.

पीठ गावाच्या सीमेवर पसरवण्याचा आदेश

गहू दळून झाल्यानंतर महिलांनी पिठांचे चार भाग केले हे पाहिल्यानंतर मात्र शांत आणि संयमी असलेले बाबा संतापले. संतापून ते त्यांना म्हणाले, तुम्ही वेड्या झालात का? हे पीठ चोरण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली, तुम्हाला काय वाटत ही तुमच्या वडलांची मालमत्ता आहे, मी तुमच्याकडून एक पैसाही गहू उसन घेतलेलाही नाही आहे. आता कृपया हे पीठ घ्या आणि गावाच्या सीमेवर फेकून या. हे ऐकून महिलांना लाज वाटली आणि त्यांनी बाबांच्या सूचनेप्रमाणे पीठ पसरवले.

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

या प्रसंगाचा उल्लेख ‘श्री साई सच्चरित्र’ मध्ये आढळतो

त्यावेळी गावामध्ये कॉलराची साथ चालू होती आणि सच्चरित्रा’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बाबांनी गव्हाचे पीठ पेरण्याचा उपाय त्यावर केला होता. गावाच्या वेशीवर गव्हाचे पीठ पसरवून कॉलरा गावातून हकलवून दिलं. यानंतर कॉलराची साथ ओसरली आणि गावकरी आनंदी झाले. भक्तांसाठी हा एक मोठा चमत्कारचं होता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांनी गव्हाचे पीठ का दळले होते?

    Ans: 'श्री साई सच्चरित्र'मध्ये वर्णनानुसार, शिर्डीमध्ये पसरलेल्या कॉलऱ्याच्या साथीपासून गावाचे रक्षण व्हावे, या हेतूने साईबाबांनी गहू दळून त्याचे पीठ गावाच्या सीमेवर पसरवण्यास सांगितले.

  • Que: साईबाबांनी स्वतः गिरणी का चालवली?

    Ans: या प्रसंगातून साईबाबांनी संकटाचा सामना श्रद्धा, सेवा आणि लोककल्याणाच्या भावनेने करण्याचा संदेश दिला, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

  • Que: या कथेतून कोणता संदेश मिळतो?

    Ans: ही कथा श्रद्धा, सबुरी, निःस्वार्थ सेवा, लोककल्याण आणि ईश्वरावरील अढळ विश्वास यांचा संदेश देते. तसेच संकटाच्या काळात समाजहिताला प्राधान्य देण्याची प्रेरणा देते.

Web Title: Sai baba what is the remedy for cholera and wheat flour story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.