Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अनोखे दृश्य; अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंगाचे दर्शन

नाशिकच्या प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात अलीकडेच एक अनोखे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे दृश्य पाहायला मिळाले. मंदिर परिसरातील अमृतकुंडातील पाणी काढल्यानंतर तळाशी प्राचीन शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 03, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील अमृतकुंडाच्या तळाशी प्राचीन शिवलिंगाचे दर्शन
  • या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चैतन्याे वातावरण पसरले
  • अमृतकुंड हे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे जलकुंड
 

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात एक दुर्मिळ आणि लक्षवेधी घटना समोर आली आहे. मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाची साफसफाई आणि संवर्धनाचे काम सुरू असताना कुंडाच्या तळाशी प्राचीन दगडी शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सविस्त जाणून घेऊया या शिवलिंगाविषयी

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये एक अत्यंत विलोभनिय दृश्य पाहायला मिळाले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) मंदिराच्या संवर्धन प्रकल्पांतर्गत अमृतकुंडातील पाणी काढून गाळ हटवण्याचे काम करत असताना ६५ फूट खोल असलेल्या कुंडाच्या तळाशी शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले. अनेक वर्षांनंतर प्रथमच हे शिवलिंग पुन्हा दर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती.

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या

पेशवेकालीन कुंडाचे महत्त्व

६५ फूट खोल असलेले हे अमृतकुंड पेशवेकालीन मानले जाते. या कुंडातील पाण्याचा वापर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अभिषेकासाठी केला जातो. त्यामुळे या कुंडाला धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. या कुंडाची रचना आणि वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे. या कुंडाला त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये सर्वोच्च धार्मिक स्थान आहे. कारण, मुख्य श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दैनंदिन पूजा, अर्चा आणि महाअभिषेकासाठी याच अमृतकुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग केला जातो. सुरक्षेच्या आणि पावित्र्याच्या कारणास्तव भाविकांना या अमृतकुंडात प्रवेश देण्यास पूर्णपणे बंदी आहे. हा परिसर अतिशय सुरक्षित ठेवला जातो.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांच्या माहितीनुसार, गाळ आणि मलबा हटवताना हे दगडी शिवलिंग आढळले. या शोधामुळे मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाबाबत नव्याने संशोधनाला चालना मिळू शकते. शिवलिंगाचे नेमके वय निश्चित झाले नसले तरी ते किमान २४० वर्षे जुने आणि त्याहून अधिक प्राचीन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sankshthi chturthi: संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्यापूर्वी काय करावे? जाणून घ्या शास्त्र, पूजा आणि पारणाची योग्य पद्धत

त्र्यंबकेश्वर मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा

‘त्र्यंबक’ या शब्दाचा अर्थ ज्यांना तीन डोळे आहेत किंवा जे तीन देवतांचे एकत्रित रूप आहेत, असे मानले जाते. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे स्थान आहे, जिथे या तिन्ही देवांची छोटी लिंगे एकाच मुख्य पात्रात स्थित आहेत. हे भव्य मंदिर नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. याच ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र ‘गोदावरी’ नदीचा उगम होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्र्यंबकेश्वर मंदिरातील अमृतकुंड म्हणजे काय?

    Ans: अमृतकुंड हे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील एक प्राचीन आणि पवित्र जलकुंड आहे. धार्मिक परंपरेनुसार, या कुंडाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.

  • Que: अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंगाचे दर्शन कसे झाले?

    Ans: मंदिर परिसरात सुरू असलेल्या साफसफाई आणि संवर्धनाच्या कामादरम्यान अमृतकुंडातील पाणी कमी करण्यात आले. त्यानंतर तळाशी असलेले शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले.

  • Que: या शिवलिंगाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: भाविकांच्या श्रद्धेनुसार, शिवलिंगाचे दर्शन अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच, हे मंदिराच्या प्राचीन परंपरा आणि धार्मिक वारशाशी संबंधित असल्याचे मानले जाते.

Web Title: Seeing the shivlinga at the bottom of amrit kund in trimbakeshwar temple nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • hindu religion
  • Nashik
  • Shivlinga

संबंधित बातम्या

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या
1

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
2

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
3

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.