फोटो सौजन्य- pinterest
दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील म्हैसूर (मैसूर) शहराजवळील चामुंडी टेकडीवर वसलेले श्री चामुंडेश्वरी देवीचे मंदिर हे देशातील प्रसिद्ध शक्तिस्थळांपैकी एक मानले जाते. देवी दुर्गेचे उग्र आणि शक्तिशाली स्वरूप असलेल्या चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. देवीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले, अशी पौराणिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया या मंदिराची पौराणिक कथा
चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्तीचं अत्यंत उग्र आणि शक्तिशाली रुप मानलं जातं. देवीच्या दुर्गेच्या भाव शक्तीपैकी एक असलेल्या चामुंडेश्वरी देवीची पूजा भारतातील अनेक भागांमध्ये केली जाते. विशेषतः कर्नाटकातील म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. देवीने चंड आणि मुंड या दोन असुरांचा वध केला त्यामुळे तिला चामुंडा असं नाव मिळालं. यापुढे तिच पूजनीय रुप चामुंडेश्वरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
यामागील पौराणिक कथा अशी की, देवी माहात्म्याचा शुंभ निशुंभ या असुराच्या संज्ञात चंड आणि मुंड हे बलवान सेनापती होते. युद्धादरम्यान देवीच्या क्रोधातून एक उग्र शक्ती प्रकट झाली. तिने चंड आणि मुंड यांचा वध करून त्यांची मत्सके देवीसमोर अर्पण केली. तेव्हा देवीने तिला चामुंडा असं नाव दिलं. यानंतर देवीने महिषासुराचाही पराभव केला म्हणूनच म्हैसूर परिसरात चामुंडेश्वरीला महिषासूरमर्दिनी म्हणूनही विशेष मान आहे. चामुंडेश्वरी देवीचा रंग गडद असून तिच्या हातामध्ये त्रिशूळ, तलवार, डमरू, खड्ग, ढाल, पाश इत्यादी आयुध आहेत. गळ्यात गंधमाळा आहेत. सिंह हे देवीचे वाहन आहे. उग्र रुप असले तरी भक्तांवर कृपा करणारी आणि रक्षण करणारी ही मातृशक्ती आहे. भय, संकट आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून तिची उपासना केली जाते. शत्रूंचा पराभव, धैर्य, आत्मविश्वास आणि मानसिक बळ मिळाव म्हणून देवीची आराधना करतात. तांत्रिक साधना आणि शक्ती उपासनेतही चामुंडेश्वरीला विशेष स्थान आहे.
चामुंडेश्वर देवीचे सर्वांत प्रसिद्ध मंदिर चांमुडेश्वर हिल्स हे म्हैसूर येथील असलेलं चामुंडेश्वर मंदिर हे सुमारे एक हजार उंच टेकडीवर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः दसरा उत्सवात या मंदिराचं धार्मिक महत्त्व अधिक वाढतं.
मुंबईतील भायखळा परिसरात चामुंडाय देवीचं एक जुनं मंदिर आहे. दक्षिण भारतीय आणि मराठी भाविक येथे मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी येतात. तर मुंबईतल्या दहिसर पूर्व येथे शनि आणि चामु्ंडाय देवी यांचे एक संयुक्त मंदिर आहे. मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रात येथे भक्तांची फार मोठी गर्दी असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चामुंडेश्वरी देवीचे एक प्रसिद्ध स्थान आहे. कोकणातील ग्रामदैवतांपैकी हे एक भक्ताचं श्रद्धास्थान मानलं जातं. येथे वार्षिक यात्रा आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. सांगली परंपरेत चौंडेश्वरी हे चामुंडेश्वरीचं एक रुप मानलं जातं आणि देवीला ग्रामसंरक्षिका म्हणून पूजल जातं. मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्र हे देवीच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानले जातात. लाल फूल, कुंकू, हळद, नारळ आणि फळांचा नैवेद्य या देवीला अर्पण केला जातो. देवीच्या कृपेसाठी दुर्गासप्तशतीमधील ‘देवी कवच’ आणि ‘अर्गला स्तोत्र’ आणि चामुंडा स्तोत्राचे पठण केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्ती दुर्गेचे उग्र आणि पराक्रमी स्वरूप मानले जाते. तिने चंड, मुंड आणि महिषासुर या असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण केल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.
Ans: देवीने चंड आणि मुंड या दोन असुरांचा वध केल्यानंतर तिला 'चामुंडा' हे नाव प्राप्त झाले. पुढे भक्तांमध्ये ती चामुंडेश्वरी या नावाने पूजली जाऊ लागली.
Ans: देवीच्या विविध हातांमध्ये त्रिशूळ, खड्ग (तलवार), ढाल, पाश, डमरू आणि इतर दैवी आयुधे असतात. ही आयुधे शक्ती, संरक्षण आणि दुष्टांचा नाश यांचे प्रतीक मानली जातात.






