Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shakambhari Navratri 2025: दुर्गेचं एक रूप; कशी साजरी केली जाते शाकंभरी पौर्णिमा आणि महत्त्व जाणून घ्या

शाकंभरी पौर्णिमा रविवार, 28 डिसेंबर रोजी आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला देवी दुर्गेच्या रुपाची पूजा केली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 28, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शाकंभरी नवरात्रोत्सव कधी सुरु होणार
  • शाकंभरी नवरात्रोत्सवाचे महत्त्व
  • शाकंभरी पौर्णिमा कशी साजरी करतात
शाकंभरी नवरात्रोत्सवला रविवार, 28 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे आणि या उत्सवाची समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. हा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. या उत्सवादरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाकंभरी पौर्णिमा कधी आहे आणि महत्त्व जाणून घ्या

शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व

पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं. तीन दिवसांच्या श्री लक्ष्मी-नारायण महायागच्या कालावधीत दररोज मुख्य दोन सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन, धार्मिक, विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात.

Shakambhari Navratri 2025: काय आहे शाकंभरी नवरात्रोत्सवाची परंपरा, कधी आणि कशी झाली सुरुवात जाणून घ्या

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या सात डोंगराच्या कुशीत वसलेली असून, ते सात डोंगर म्हणजे मधू, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय, वरद प्रदान केले. या सात राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्यातील या सात राक्षसांवर विजय मिळविता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही.

शाकंभरी देवीची उत्पत्ती

देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल सांगायचे झाल्यास एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊॅं टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी ‘शाकंभरी देवी’ या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात.

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

कुठे साजरी केली जाते

शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम 60 आणि जास्तीतजास्त 108 भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शाकंभरी देवी कोण आहे?

    Ans: शाकंभरी देवी ही आदिशक्ती दुर्गेचंच एक रूप आहे. तिला अन्नदाता देवी मानले जाते. दुष्काळाच्या काळात देवीने आपल्या शरीरातून शाक-भाज्या उत्पन्न करून प्रजेचे पालन केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले.

  • Que: शाकंभरी पौर्णिमा कधी साजरी केली जाते?

    Ans: पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. काही ठिकाणी याच काळात शाकंभरी नवरात्रही पाळले जाते.

  • Que: देवीला शाकभाज्यांचा नैवेद्य का अर्पण केला जातो?

    Ans: देवीने शाकभाज्यांद्वारे जगाला जीवनदान दिले असल्याने तिच्या पूजेत 60 ते 108 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

Web Title: Shakambhari navratri 2025 how is shakambhari purnima celebrated importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
1

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
2

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
4

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.