फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्ष 2026 ची सुरुवात काही दिवसांनी होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. यावर्षी काही राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या सुरुवातीला एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली राजयोग तयार होणार आहे, ज्याला गजकेसरी राजयोग म्हणतात.
पंचांगानुसार, हा राजयोग शुक्रवार, 2 जानेवारी 2026 रोजी चंद्र आणि देवगुरुच्या विशेष युतीने तयार होणार आहे. या दिवशी, चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार ज्या ठिकाणी गुरू आधीच स्थित आहे. गुरू-चंद्राची ही शुभ युती व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यशाच्या नवीन संधी निर्माण करू शकते. गजकेसरी राजयोग हा ज्योतिषशास्त्रात खूप शक्तिशाली योग मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे अनेक राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळतो. गजकेसरी राजयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोगामध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीमधून तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
गजकेसरी राजयोग हा मिथुन राशीमध्ये तयार होत आहे. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. या काळामधील तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअर अधिक स्थिर होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल.
तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारीच्या अनेक संधी मिळतील. नवीन प्रकल्प, सौदे किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. शिक्षण, अध्यात्म, परदेश प्रवास आणि करिअरमध्ये वाढ होऊ शकते. विद्यार्थी आणि संशोधनात सहभागी असलेल्यांना लक्षणीय यश मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्र आणि गुरु (बृहस्पती) एकमेकांपासून केंद्रस्थानी (१, ४, ७ किंवा १० भावात) असतील तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग बुद्धिमत्ता, धन, प्रतिष्ठा आणि यश देणारा मानला जातो.
Ans: नोकरीत बढती, नवीन संधी, व्यवसायात विस्तार, वरिष्ठांकडून मान्यता आणि नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात.
Ans: कौटुंबिक सौख्य वाढेल, जोडीदाराशी नाते दृढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.






