अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई सुरु केली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध नांदेड (Nanded News) ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत विष्णुपूरी शिवारातील गोदावरी नदी पात्रात रविवारी सकाळी ११:०० वाजता एक थरारक आणि धाडसी छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत रेती माफियांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष रणनीती आखली आहे. (Crime News)
महसूल बुडवणाऱ्यांना पोलिसांचा इशारा
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाला विश्वासार्ह सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली की, असर्जन शिवारातील डॅम जवळ गोदावरी नदी पात्रात काही अज्ञात इसम मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री वापरून बेकायदेशीर रेती उपसा करत आहेत. ही माहिती मिळताच विलंब न लावता, पथकाने सापळा रचला. शत्रूला सुगावा लागू नये अशा गनिमी काव्याने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. छाप्यात पोलिसांना नदी पात्रात तराफे आणि इंजिनच्या सहाय्याने रेती उपसा सुरू आहे.
हे देखील वाचा : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा
घटनास्थळीच यंत्रसामग्रीचा केला ‘गेम ओव्हर’
या कारवाईचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी केवळ मुद्देमाल जप्त केला नाही, तर तो पुन्हा गुन्ह्यासाठी वापरता येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली. जप्त केलेले ८ तराफे (किंमत ४ लाख रुपये) आणि एक इंजिन (३ लाख रुपये) हे पंचांसमक्ष जागीच तोडून आणि जाळून पूर्णपणे नष्ट करण्यात आले. याशिवाय साठवून ठेवलेली ५ ब्रास रेती खाजगी वाहनाच्या सहाय्याने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कठोर निर्णयामुळे रेती माफियांना आता आर्थिक फटका बसण्यासोबतच त्यांच्या यंत्रणेचीही मोठी हानी झाली आहे.
साहित्य घेतले ताब्यात
पोलिसांची चाहूल लागताच, दोन अनोळखी आरोपींनी पात्रात उड्या मारून पळ काढला. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून तिथल्या साहित्याचा ताबा घेतला.
हे देखील वाचा : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका
रेशन कार्डासाठी उत्पन्न मर्यादा २ लाखांपर्यंत ?
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्याबाबत राज्य शासनाने पुरवठा विभागाकडे सविस्तर अहवाल मागवला आहे. वाढती महागाई आणि सध्याच्या उत्पन्न मयदितील विसंगती लक्षात घेता निकष शिथिल करण्याच्या विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. सध्या प्राधान्य शिधापत्रिकेसाठी शहरी भागात वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रुपये तर ग्रामीण भागात ४४ हजार रुपये आहे. ही मर्यादा वास्तव परिस्थितीशी विसंगत असल्याचे नमूद करत ती दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या दशकात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असली तरी उत्पन्न मर्यादा बदललेली नाही. परिणामी अनेक गरजू कुटुंबे निकषात न बसल्याने योजनेपासून वंचित राहत आहेत. उत्पन्न मर्यादा महागाई निर्देशांकाशी जोडल्यास ती आपोआप वाढत राहील, असेही अहवालात सुचवण्यात आले आहे.






