ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला अधिक महत्त्व आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. यंदा ही वटपौर्णिमा २१ जून रोजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात अशा काही राज्यांमध्ये साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा उपवास करत असाल तर तुम्ही या नियमांचे पालन करायला हवे. ( फोटो सौजन्य- freepik)
वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा
वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्व असते. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या उत्तम आयुष्यासाठी उपवास करतात. परंतु काही वेळेस उपवासाचा त्रास होऊ शकतो. उपवासाच्या दिवशी काहींना आरोग्याशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मळमळणे, आंबटपणा, कमी रक्तदाब अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते.
वटपौर्णिमेचा उपवास करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळं खाऊन उपवास सोडू शकता
दुसरा पर्याय वडाची पूजा करून झाल्यावर पुजेसाठी जे खाण्याचे पदार्थ नैवेद्याला दाखवले जातात ते तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता. उपवास सोडताना सात्विक पद्धतीचे अन्न खाऊ शकता.
उपवासाला कोणते पदार्थ खावे
उपवासाला साबुदाणा एके साबुदाणा नको! ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही उपसावाबद्दल वापरली जाणारी म्हण अगदी तंतोतंत पटणारी आहे. रोजच्या जेवणापेक्षा कितीतरी अधिक उष्मांक असलेले पदार्थ उपवासाला खाल्ले जातात परंतु आजून काहीतरी उपवासाला चालणारे वेगळे पदार्थ खावे असे वाटते. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घेऊया.
राजगिरा
साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ हे नेहमीचे पदार्थ तुम्ही सोडल्यास तुम्ही राजगिराचा वापर करू शकता. राजगिराच्या पिठापासून तुम्ही थीलीपीठ, खीर बनवू शकता. तसेच, राजगिऱ्याच्या लाह्या दुधात घालूनदेखील खाऊ शकतात.
शिंगाडा
आख्खा शिंगाडा मीठ घालून उकडून खाता येईल. शिंगाड्याच्या पिठाची खीर किंवा शिंगाड्याच्या पिठाची दाण्याच्या आमटीसारखी आमटीदेखील करता येईल. त्याचे लाडूसुद्धा बनवता येतील.
वरीचे तांदूळ
वरीचे तांदूळ हे भातासारखे खाता येतील.