
फोटो सौजन्य- गुगल
सुपर अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमान घट होऊन जलसाठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन, सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या पाणीगळती या रोखणे, माथा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई तसेच पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यावर महापालिकेने भर द्यावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या निधीतून ९० विहिरींची साफसफाई, आवश्यक दुरुस्ती करून विहिरींमध्ये पंप टाकून नागरिकांना पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कूपनलिकांच्या पाण्याचा वापर ठाणे शहरातील २०२४ कूपनलिकांपैकी ३९२ नादुरुस्त कूपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली असून उर्वरित कूपनलिकांची देखभाल सुरू आहे. तसेच ८० कूपनलिकांना पर्जन्यजलसंचयन व रिचार्ज पिट तयार करण्यात येणार आहेत.
यामुळे पावसाळ्यात जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढून कूपनलिकांची पाणी देण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी ४० नवीन कूपनलिका खोदण्याचे नियोजन असून त्यांचा वापर शाळा, उद्याने, मैदाने व झोपडपट्टी परिसरात इतर वापरासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता होणार आहे.
ही कामे नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ठाणे शहरातील एकूण ३५ विहिरीवर अल्ट्रा फिल्ट्रेशन व आर. ओ. बसवून त्यांचे पाणी पिण्यायोग्य करण्यात येत आहे. यापैकी १२ विहिरींचे काम पूर्ण झाले असून त्यांचा वापर सुरू आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये आणखी ८ विहिरीचे काम पूर्ण करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२७ पूर्वी उर्वरित १५ विहिरींचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय २१० महापालिकेच्या व २०५ खाजगी विहिरीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर वाढविण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा वाहिन्यांची गळती शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा (रोबोट) रडार यंत्रणेचा वापर करून मुख्य जलवाहिन्यांवरील गळती शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे.
करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकूण ४२७ अनधिकृत नळ संयोजनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच १४ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अनधिकृत इमारतीचा पाणीपुरवठा खाड़ित करण्याबाबत ८२० नळजोडण्या, १२२ बोअरवेल आणि ४८ मोटर जप्त करण्यात आल्या आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: सुपर अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमान घटून जलसाठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: विहिरींची साफसफाई, कूपनलिकांची दुरुस्ती, नवीन कूपनलिका खोदणे आणि पाणीगळती रोखण्यावर भर दिला जात आहे.
Ans: महापालिकेच्या निधीतून ९० विहिरींची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्ती केली जात आहे.