Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत

Money Vastu Tips: महिन्याच्या सुरुवातीला पगार हातात आल्यानंतर बचत करण्याचा विचार केला जातो; मात्र अचानक येणाऱ्या विविध खर्चांमुळे महिनाअखेरीस पैसा कमी पडतो. या पार्श्वभूमीवर वास्तुशास्त्रात घराची रचना, स्वच्छता आणि वस्तूंची मांडणी याबाबत काही मान्यता सांगितल्या जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 12:25 PM
Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ईशान्य कोपरा स्वच्छ आणि मोकळा ठेवण्याची वास्तुमान्यता
  • तुटक्या व अनावश्यक वस्तूंचा पसारा टाळण्याचा सल्ला
  • पैसा टिकवण्यासाठी प्रत्यक्षात बजेट आणि बचतीचे नियोजनही महत्त्वाचे
 

Vastu Tips for Money: बऱ्याच जणांचं असंच होतं. महिन्याची सुरुवात होते, पगार हातात येतो. तेव्हा वाटतं या महिन्यात थोडी बचत करु. पण 10-15 दिवस झाले की एक ना एक खर्च निघतोय. कधी लाईटचं बिल जास्त, कधी पाहुणे आले, कधी काही तरी बिघडलं. माहिना संपायच्या आत खिसा रिकामा होतो. फक्त खर्चाचा हिशोब ठेवून उपयोग नाही, कधी कधी आपल्या घरातल्या काही सवयीपण पैसा टिकू देत नाही.

वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की घर कसं ठेवलंय, कोणती वस्तू कुठे ठेवलीये याचा पण आपल्या पैशावर परिणाम होतो. घरात सतत पसारा असेल, घाण असेल तर नकारात्मकता वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक गोष्टींवर पण होतो. म्हणून काही छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर घरात लक्ष्मी टिकून राहते. Money Vastu Tips:

१. घराचा ईशान्य कोपरा नेहमी मोकळा ठेवा.

घराची उत्तर-पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. या कोपऱ्याला देवाचा कोपरा पण म्हणतात. हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा असायला हवा. तिथे जुनं सामान, तुटक्या वस्तू, कचरा असं काहीही टाकू नका. बऱ्याच लोकांची सवय असते की नको असलेल्या वस्तू एका कोपऱ्यात टाकून देतात. पण वास्तूनुसार असं केल्याने घरात पैसा येण्यात अडथळा येतो. आठवड्यातून एकदा तरी हा कोपरा नीट झाडून पुसून घ्या. तिथे जास्त सामान भरू नका.

२. तिजोरी कुठे ठेवता याला खूप महत्त्व आहे.

आपण पैसे, दागिने, महत्त्वाची कागदपत्रं जिथे ठेवतो ती जागा पण महत्त्वाची आहे. तिजोरी किंवा कपाट जिथे पैसे ठेवता ते दक्षिण-पश्चिम दिशेला असू नये. त्याचं तोंड नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडेल असं असावं. असं केल्याने घरात पैसा टिकतो. तिजोरीच्या आजूबाजूला पण कचरा किंवा घाण ठेवू नका. जिथे पैसा ठेवतो तिथे आदराने आणि स्वच्छतेने ठेवावा.

३. तुटकं फुटकं सामान घरात साठवून ठेवू नका.

प्रत्येक घरात एक तरी कप्पा असतो जिथे तुटकी भांडी, बंद पडलेला मिक्सर, खराब झालेलं घड्याळ, फाटके कपडे पडलेले असतात. ‘कधी तरी कामाला येईल’ म्हणून आपण ते ठेवून देतो. पण वर्षानुवर्षे ते तसंच पडून राहतं. वास्तुशास्त्रानुसार अशा खराब वस्तू घरात ठेवल्याने घरातली चांगली ऊर्जा निघून जाते. त्यामुळे जे वापरण्यात नाही ते लगेच घराबाहेर काढा. घर मोकळं दिसेल आणि मन पण हलकं होईल.

४. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा

स्वयंपाकघर हे घराचं पोट आहे. तिथेच आपलं अन्न शिजतं. जर तिथेच घाण असेल तर घरात आजार आणि पैशांची कमतरता येते. रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नका. फ्रीजमध्ये खराब झालेलं अन्न जास्त दिवस ठेवू नका. धान्याचे डबे उघडे ठेवू नका. स्वयंपाकघर नेहमी आवरलेलं आणि लख्ख असलं की घरात अन्न आणि पैसा दोन्ही टिकून राहतं.

५. मुख्य दरवाजा हा सगळ्यात महत्त्वाचा

आपल्या घराचा मुख्य दरवाजा हाच पैशाचा आणि चांगल्या ऊर्जेचा येण्याचा रस्ता आहे. तिथे अंधार असेल, चपलांचा ढीग असेल, कचरा असेल तर चांगली ऊर्जा घरात येणार कशी? मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. तिथे चांगला उजेड असू द्या. तुटकी चप्पल, फाटकी सतरंजी दारासमोर ठेवू नका.

दार स्वच्छ आणि सुंदर असेल तर बघणाऱ्याला पण बरं वाटतं आणि घरात पण सकारात्मक वातावरण राहतं.या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण याचा परिणाम मोठा होतो. फक्त वास्तूने पैसा येत नाही, काम तर करावंच लागतं. पण घर नीटनेटकं आणि स्वच्छ असेल तर मन शांत राहतं, कामात लक्ष लागतं आणि मग पैसा पण आपोआप टिकू लागतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips for money 5 things at home that may affect financial stability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Marathi News
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण
1

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
2

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
3

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
4

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.