नोकरी, बंगला, जमीन वय 40 तरी लग्न जमेना (फोटो सौजन्य- pinterest)
हल्ली प्रेमात पडणे जेवढे सोपे आहे तेवढेच त्या व्यक्तीसोबत लग्नासाठी परवानगी मिळवणे कठीण होत चालले आहे. मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांचे नाते लग्नाच्या टप्प्यावर पोहोचवायचे असते, परंतु कधीकधी कुटुंबातील सदस्यांच्या संमतीमुळे, सामाजिक विचारसरणीमुळे किंवा परस्पर समजुतीमुळे अडथळे येतात. बऱ्याचदा या समस्या तणावाचे कारण असू शकते. त्यामुले वास्तू आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या हे उपाय जाणून घ्या.
घरामधील प्रत्येक दिशेचा आपल्या जीवनावर विविध प्रकारे प्रभाव पडत असतो. ज्यावेळी आपण नातेसंबंधाचा विचार करतो त्यावेळी नैऋत्य दिशेकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. या दिशेमुळे नातेसंबंधामध्ये स्थिरता टिकून राहते. जर एखाद्या व्यक्तीला प्रेमविवाहात अडथळे येत असल्यास तर तुमच्या घरातील नैऋत्य दिशेकडे विशेष लक्ष द्या. ही दिशा सक्रिय ठेवा. या दिशेच्या भिंतीचा रंग शक्यतो क्रीम असावा. तसेच घरातील वातावरण सकारात्मक असावे त्यामुळे नाते मजबूत होण्यास मदत होते.
असे म्हटले जाते की, रंगांचा आपल्या मनःस्थितीवर आणि विचारांवर परिणाम होतो. नातेसंबंधाच्या दृष्टीने विचार करायला गेल्यास रंगांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बेडरुमची सजावट करताना हलके आणि गडद या दोन रंगाचा वापर करावा. यामुळे नात्यामध्ये संतुलन राहते आणि घरातील वातावरणात गोडवा कायम टिकून राहतो. त्याचसोबत बेडरूममध्ये दररोज हलका परफ्यूम स्प्रे करा, जेणेकरून वातावरण आल्हाददायक राहील. त्याचसोबत लग्नात येणारे अडथळे कमी होतील.
जर लग्नाची वारंवार चर्चा चालत असल्यास किंवा कुटुंबातील सदस्य तयार होत नसल्यास हा एक उपाय करुन बघा. यावेळी दररोज संध्याकाळी तुळशीजवळ एक छोटा तुपाचा दिवा लावा. दिवा लावण्याच्या वेळी ओम कामदेवाय नम: या मंत्रांचा 11 वेळा जप करावा. या मंत्राने केलेली पूजा नातेसंबंध जोडणारी ऊर्जा वाढवते आणि घराचे वातावरण शांत करते. ज्यावेळी घरातील वातावरण बदलते त्यावेळी लोकांची विचारणी बदलते.
ताजी फुले किंवा रंगीबेरंगी क्रिस्टल बॉल खोलीत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा घरात संतुलित राहण्यास मदत होते.
दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. तसेच ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मायै नमः” या मंत्रांचा शक्यतो 108 वेळा जप करावा.
त्याचसोबत सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)