फोटो सौजन्य- istock
आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. मूलांक 8 चा स्वामी शनिदेव आहे. या लोकांना कुटुंबातील लोकांवर जास्त लक्ष द्यावे लागेल. तसेच तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र राहील. व्यवसाय करणाऱ्याना नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही बदलांना तोंड द्यावे लागेल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तसेच तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायात फायदा होईल. नवीन संपर्क आणि नेटवर्किंगचा फायदा उद्योजकांना भविष्यात होऊ शकतो.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदारी येऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. तुमच्यावरील मानसिक ताण कमी होईल. तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा.
मूलांक 7 असलेल्यांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदारी येऊ शकते त्या तुम्ही कठोर मेहनत घेऊन पार कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कामाच्या संदर्भात सहलीला जावे लागू शकते, जे फायदेशीर ठरेल.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांवर कुटुंबाची जबाबदारी राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळू शकते. कोणतेही निर्णय घेताना शांततेने घ्या.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. जर तुम्ही व्यवसायात नवीन योजना आखत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)