Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक नियम

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. वटपौर्णिमेच्या पूजेत साडीचा रंगही महत्त्वाचा मानला जातो. यावेळी काही रंग शुभ मानले जातात तर काही काही रंग या दिवशी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 25, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी
  • कोणत्या रंगांची साडी नेसणे असते शुभ
  • वटपौर्णिमेचे धार्मिक नियम काय आहेत
 

ज्या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात, तो सण म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात तसेच उपवास करतात. हा दिवस म्हणजे महिलांसाठी साज-श्रृंगार करण्याचा दिवस, या दिवशी अनेक महिला विविध रंगांच्या साड्या नेसतात. पण तुम्हाला माहितीय का? काही रंग असे असतात, जे धार्मिक श्रद्धेनुसार पूजेसाठी अजिबात योग्य मानले जात नाहीत. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्याचा असल्याने या दिवशी काही विशिष्ट रंग परिधान न करण्याची श्रद्धा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगांची साडी नेसू नये जाणून घ्या

वटपौर्णिमा कधी आहे?

पंचांगानुसार, वटपौर्णिमा महाराष्ट्रात सोमवार, 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असल्याने विवाहित महिला वटसावित्री व्रत, वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात. पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप-तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. पंचागानुसार, वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

Vat Purnima 2026: 28 की 29 कधी आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगांची साडी नेसणे टाळावे

वटपौर्णिमेच्या दिवशी काळा, पूर्ण पांढरा रंग आणि गडद राखाडी रंगांची साडी नेसणे टाळावे. हिंदू धर्मामध्ये काळा रंग अनेक शुभ कार्यांमध्ये टाळला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंगांचा संबंध शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. वटपौर्णिमेसारख्या मंगल प्रसंगी काळी साडी नेसणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे अनेक महिला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळतात.

पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक असला तरी तो अनेक ठिकाणी वैराग्य आणि शोकाशीही जोडला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याऐवजी रंगीत किंवा पारंपरिक साडीला प्राधान्य दिले जाते.

राखाडी किंवा फिकट उदास रंग काही परंपरांमध्ये उत्साह आणि मंगलतेच्या विरुद्ध मानले जातात. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तेजस्वी आणि सकारात्मकता दर्शवणारे रंग अधिक शुभ मानले जातात.

कोणत्या रंगांची साडी नेसणे शुभ आहे

वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा आणि केशरी रंग शुभ मानले जातात. हे रंग सौभाग्य, समृद्धी, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. विशेषतः हिरवी आणि लाल साडी परिधान करण्याची परंपरा अनेक भागांत आढळते.

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान

काय आहेत धार्मिक नियम

वटपौर्णिमेचे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. सावित्रीचे धैर्य, निष्ठा आणि सौभाग्य यांचे प्रतीक म्हणून या दिवशी महिलांनी मंगलसूचक वस्त्रे आणि अलंकार धारण करावेत, अशी परंपरा आहे. म्हणूनच शुभ रंगांच्या साड्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते?

    Ans: वटपौर्णिमेला लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत

  • Que: वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हिरवा रंग सुखी वैवाहिक जीवन, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक महिला या दिवशी हिरवी साडी नेसतात.

  • Que: वटपौर्णिमेच्या पूजेत साडीच्या रंगाचा धार्मिक दृष्टिकोनातून प्रभाव असतो का?

    Ans: धार्मिक श्रद्धेनुसार शुभ रंग सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण निर्माण करतात. मात्र व्रताचे खरे महत्त्व श्रद्धा, भक्ती आणि पूजाविधीत आहे.

Web Title: Vat purnima 2026 religious rules do not wear sarees of these colors on vat purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.